अग्नी (देवता)
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट हिंदू दैवत अग्नी हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे.ते 'अग्नी'चे दैवत आहे[१]ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नी हा दूत आहे.[२] तो तरूण आहे व सदैव तरूणच राहतो कारण अग्नी हा दर दिवशी नविन प्रज्वलीत केल्या जातो.तो अमरही आहे.
या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.वरुण व इंद्राप्रमाणे ते ऋग्वेदातील एक परमोच्च दैवत आहे.तो पृथ्वी व स्वर्ग यामधील तसेच देव व मानवामधील एक दुवा आहे.
जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरेच यत् | नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्निः इति सूरिभिः || बृहद्देवता २.२.४
सर्व भूतांच्या आधी जन्मलेला , यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत.विस्तव हे अग्नीचे पार्थिव रुप होय.
संदर्भ- संस्क्रुति कोष
संदर्भ
संस्क्रुति कोष साचा:संदर्भयादी
- ↑ Cavendish, Richard (1998). Mythology, An Illustrated Encyclopedia of the Principal Myths and Religions of the World. ISBN 1-84056-070-3
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत