रामधारीसिंह दिनकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५५, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट साहित्यिक रामधारीसिंह दिनकर (जन्म - २३ सप्टेंबर, इ.स. १९०८ मृत्यू - २५ एप्रिल, इ.स. १९७४) हे साहित्यकार होते.

परिचय संपादन

रामधारीसिंह दिनकर यांनी इ.स. १९३२ साली पटना विश्वविद्यालयातून इतिहास विषयात बी.ए. (ऑनर्स) ही पदवी घेतली. इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत बिहार सरकारच्या अखत्यारीतील एका संस्थेत सब रजिष्ट्रार या पदावर कार्य केले. इ.स. १९४३ ते इ.स. १९४९ या कालावधीत माहिती विभागात नोकरी केली. रामधारीसिंह दिनकर हे इ.स. १९५२ ते इ.स. १९६४ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९६५ मध्ये ते भागलपूर विश्वविद्यालयाचे कुलपती बनले व त्यानंतर एका वर्षाने भारताच्या केंद्र सरकारचे हिंदी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.

पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • 'कुरूक्षेत्र' साठी साहित्यकार संसद (अलाहाबाद) पुरस्कार (इ.स. १९४८)[]
  • नागरी प्रचारिणी सभेचे द्विवेदी पदक (दोन वेळा)
  • 'उर्वशी'साठी उत्तरप्रदेश सरकारचा पुरस्कार
  • नागरी प्रचारिणी सभेचा रत्नाकर पुरस्कार
  • 'संस्कृति के चार अध्याय' यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९६०)
  • पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९५९)
  • भागलपूर विद्यापीठाची डि.लीट ही मानद उपाधी (इ.स. १९६१)
  • 'उर्वशी'साठी ज्ञानपीठ पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:विस्तार