Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
हसमुख धीरजलाल सांकलिया - मराठीपिडिया Jump to content

हसमुख धीरजलाल सांकलिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
एच.डी. सांकलिया (इ.स. १९४० चे छायाचित्र)

हसमुख धीरजलाल सांकलिया (प्रचलित नाव - एच.डी. सांकलिया) (जन्म : १० डिसेंबर, इ.स. १९०८. मुंबई मृत्यू : २८ जानेवारी, इ.स. १९८९. पुणे) हे भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते होते.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

एच.डी. सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे एका गुजराती कुटुंबात झाला. सुरुवातीला सांकलिया संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी नालंदा विद्यापीठ या विषयात एम.ए. केले होते. नंतर त्यांनी "गुजराथचा पुरातत्त्वीय अभ्यास" या विषयावर लंडन विद्यापीठाची आचार्य (पीएच.डी.) ही पदवी मिळवली.

भूषविलेली पदे[संपादन | स्रोत संपादित करा]

संशोधन[संपादन | स्रोत संपादित करा]

हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी भारतात ठिकठिकाणी उत्खनने घडवून आणली. पेहेलगाम, नाशिक, अहमदाबादजवळ लांघणज, जोर्वे, नेवासे, पुण्याजवळील इनामगाव, कोल्हापूरजवळ ब्रह्मपूर अशा अननेक ठिकाणी त्यांनी उत्खनने केली. या उत्खननातून मानवी सांगाडे, घरांचे नमुने, नाणी, हत्यारे, दागिणे, धान्यांचे अवशेष असे अनेक प्रकार त्यांना मिळाले. त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी अनेक संस्कृती प्रकाशात आणल्या. ब्रह्मपूरचा रोमशी होत असलेला व्यापार सांकलियांनी दाखवून दिला तसेच द्वारकानगरीची प्राचीनता महाभारत काळापर्यंत जात नाही हे सिद्ध केले. वाङमय व भूगोल यांच्या अभ्यासातून रावणाची लंका म्हणजे श्रीलंका देश नव्हे असे मतही त्यांनी मांडले.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकाशित साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. द युनिव्हर्सिटी ऑफ नालंदा (इंग्रजी पुस्तक , १९३४ , १९७३)
  2. द आर्किऑलॉजी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक , १९४१)
  3. प्रिलिमिनरी रिपोर्ट ऑन थर्ड गुजरात प्रीहिस्टॉरिक एक्स्पेडिशन ॲन्ड ह्युमन रिमेन्स डिस्कव्हर्ड सो फार (सहलेखक इरावती कर्वे आणि जी.एम. कुरूलकर) (इंग्रजी पुस्तक , १९४५)
  4. इन्व्हेस्टिगेशन इनटू प्री-हिस्टॉरिक आर्किऑलॉजी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक , १९४६)
  5. हिस्टॉरिकल जिओग्राफी ॲन्ड कल्चरल एथनोग्राफी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक , १९४९)
  6. द गोदावरी पॅलिओलिथिक इंडस्ट्री (इंग्रजी पुस्तक , १९५२)
  7. रिपोर्ट ऑन द एक्स्कवेशन ॲट नाशिक अँड जोर्वे (सहसंपादक - शां.भा.देव) (इंग्रजी पुस्तक , १९५५)
  8. एक्स्कवेशन ॲट महेश्वर अँड नवदाटोली (इंग्रजी पुस्तक , १९५५)
  9. फ्रॉम हिस्ट्री टू प्रिहिस्टरी ॲट नेवासा (इंग्रजी पुस्तक , १९६०)
  10. इंडियन आर्किऑलॉजी टूडे , (इंग्रजी पुस्तक , १९६४)
  11. प्रीहिस्टरी अँड प्रोटोहिस्टरी ऑफ इंडिया अँड पाकिस्तान (इंग्रजी पुस्तक , १९६३ , १९७३)
  12. स्टोन एज टूल्स, देअर टेक्निक्स अँड प्रॉबबल फन्कशन्स (इंग्रजी पुस्तक , १९६५)
  13. चाल्कोलिथिक नवदाटोली (इंग्रजी पुस्तक , १९७१)
  14. इन्डस सिव्हिलायझेशन (गुजराती पुस्तक , १९६७)
  15. एक्स्कवेशन ॲट अहर (इंग्रजी पुस्तक , १९६९)
  16. रामायण मीथ अँड रियालीटी (इंग्रजी पुस्तक , १९७३)
  17. आर्किऑलॉजी अँड द रामायण (गुजराती पुस्तक , १९७३)
  18. महाराष्ट्रातील पुरातत्त्व (सहलेखक - म.श्री. माटे) (मराठी पुस्तक , १९७६)
  19. न्यू आर्किऑलॉजी : इट्स स्कोप अँड एप्लीकेशन इन इंडिया (इंग्रजी पुस्तक , १९७७)
  20. महाभारत अँड रामायण, फॅन्सी ऑर हिस्ट्री ? (इंग्रजी पुस्तक , १९७७)
  21. द डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन अनडिवायडेड इंडिया # आर्किऑलॉजी अँड द रामायण (गुजराती पुस्तक , १९७७)
  22. प्रीहिस्ट्री इन इंडिया (इंग्रजी पुस्तक , १९७७)
  23. द रामायण इन हिस्टॉरिकल परस्पेक्टीव्ह (इंग्रजी पुस्तक , १९८२)
  24. मेसोलिथिक ॲन्ड प्रीमेसोलिथिक इंडस्ट्रीज ॲट सांगलकल (इंग्रजी पुस्तक , १९९१)
  25. अन् इन्ट्रोडक्शन टू आर्किऑलॉजी (इंग्रजी पुस्तक , १९६६)
  26. एक्स्कवेशन ॲट कोल्हापूर
  27. बॉर्न फॉर आर्किऑलॉजी अन् ऑटोबायोग्रफी
  28. एक्स्कवेशन ॲट इनामगाव

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:सामाजिकशास्त्र शाखा