Jump to content

किरण नगरकर

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
किरण नगरकर,चंडीगढ़ 2016
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
किरण नगरकर यांचे मेलबर्न येथील कार्यक्रमात घेतलेले छायाचित्र (इ.स.२०१२)

किरण नगरकर (इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - - 5 सप्टेंबर 2019 []) हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक आहेत.



कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

किरण नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८ च्या सुमारास 'अभिरुची' मध्ये प्रसिद्ध झाली []. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली</ref name="मटा२०१२०११२">. मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची 'रावण आणि एडी '(इ.स. १९९४) ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. 'गॉड्स लिटल सोल्जर 'ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. रावण ॲन्ड एडीककल्ड (इ.स. १९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. इ.स. २००१ साली ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबऱ्या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत. ह्‌याशिवाय 'कबीराचे काय करायचे?' आणि 'बेडटाईम स्टोरी' ह्या दोन नाट्यकॄती त्यांच्या नावावर आहेत. ' स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनय ही केला आहे. अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेता येते.

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:मराठी साहित्यिक