वसई रोड
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा वसई रोड हे वसई शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. वसई रोड मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथून मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकाकडे जाणार एक उपमार्ग सुरू होतो. वसई-दिवा व दिवा-पनवेल ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.
नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]
येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. साचा:मुंबई महानगर क्षेत्र