Jump to content

पनवेल रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

उपनगरी रेल्वे फलाट

पनवेल हे पनवेल शहरामधील व नवी मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवर, कोकण रेल्वेवर आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी, ठाणे , अंधेरी साठी धीम्या लोकल व मध्य रेल्वेवरून डहाणू , वसई साठी लोकल धावतात. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेलला थांबतात. पनवेल - पुणे पॅसेंजर, पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस, पनवेल - नांदेड एक्सप्रेस ई. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेसदेखील पनवेलवरून धावते.

पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. हे रेल्वे स्थानक सिडको द्वारे विकसित केले गेले आहे. पनवेल येथे नवीन टर्मिनस तयार होत आहे त्यामुळे सीएसएमटी , दादर प्रमाणे पनवेल येथुन सुद्धा दूर अंतराच्या रेल्वे गाड्या सुरू होतील यामुळे दादर , सीएसएमटी, कल्याण , एलटीटी या स्थानकांचा भार कमी होईल तसेच उपनगरीय रेल्वेवरील ताणही कमी होईल . नवी मधील नागरिकांना कल्यान , ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही