पंडित जसराज
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक पंडित जसराज (जन्म : २८ जानेवारी १९३०, पिली मांदोरी, जिल्हा: हिस्सार, हरियाणा[१]; - १७ ऑगस्ट २०२०,न्यू जर्सी-अमेरिका[२]) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत.
बालपण[संपादन | स्रोत संपादित करा]
पंडित जसराज यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे गायक होते. जसराज चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. जसराजांनी सुरुवातीला तबल्याचे शिक्षण घेतले. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांच्याकडून त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी प्रथम गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांच्या घरात मेवाती घराण्याची गायकी होती. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानत.
शिष्य[संपादन | स्रोत संपादित करा]
पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, पंडित रतन मोहन शर्मा, शहनाई वादक लोकेश आनंद, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांना संगीत शिक्षण दिले. भारताबरोबरच ते अमेरिका, कॅनडा येथे संगीत शिक्षण देत असत. १९९५ मध्ये त्यांनी पंडिता तृप्ती मुखर्जी यांच्याबरोबर न्यू जर्सी येथे पंडित जसराज इन्स्टीट्यूट फॉर म्युझिकची स्थापना केली.[३]
चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]
पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]
- पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७५)[२][४]
- डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ॲवॉर्ड - फेब्रुवारी १२ १९९९ रोजी टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे
- पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९९०)[२][१]
- पद्मविभूषण पुरस्कार, (शास्त्रीय कंठसंगीत-इ.स. २०००)[४]
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार (२०१३)
- मारवाड संगीत रत्न पुरस्कार
- मास्तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- लता मंगेशकर पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९८७)[२][५]
- संगीत कला रत्न पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२०१०)
- सुरेल गुरू पुरस्कार
- पुणे महापालिकेतर्फे स्वरसागर संगीत पुरस्कार (२०१६)
- गंगूबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार[२]
- स्वस्ति संगीत पुरस्कारम् (इ.स. २००८)
- हरियाणा सरकारचा संगीत मार्तंड पुरस्कार[१](इ.स.१९७६)
- सुमित्रा चरत राम जीवनगौरव पुरस्कार[६]
- इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनने मंगळ व गुरू या ग्रहांदरम्यान ११ नोव्हेंबर २००६ रोजी एक छोटा ग्रह शोधून काढला होता. या ग्रहाला २००६ व्हीपी३२ (क्रमांक – ३००१२८) असे तात्पुरते नाव दिले होते. याच ग्रहाचे नाव नंतर ‘पंडित जसराज लघुग्रह’ असे झाले. (२०१९)[७]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:हिंदुस्तानी संगीत साचा:संदर्भनोंदी साचा:संगीतातील अपूर्ण लेख