Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मीर उस्मान अली खान - मराठीपिडिया Jump to content

मीर उस्मान अली खान

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
हैदराबादचे निजाम - मीन उस्मान अली खान

मीन उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा '(जन्म : ६ एप्रिल १८८६; मृत्यू: २४ फेब्रुवारी १९६७) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८ च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले।[]

२६ जानेवारी १९५०रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
निजाम त्यांच्या पंतप्रधानांसह - "किशन प्रसाद" आणि इतर

निजामाला "निझाम सरकार" किंवा "हजूर-ए-निजाम" म्हणत.[] त्यानंतर भाषेच्या आधारावर हैदराबाद राज्याचे विभाजन होऊन त्याचे तुकडे आंध्र प्रदेशाचे, कर्नाटकाचे आणि महाराष्ट्राचे भाग बनले.चा भाग बनला. त्यावेळवा निजाम हा सहावा निज़ाम -महबूब अली खानचा मुलगा होत.

रझाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्य निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे.[] हैदराबादच्या या रझाकार दालने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणात या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिल्या जाते.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कासीम रझवी

रझाकरांच्या क्रौर्याची परिसीमा आजही जुन्या जाणत्या लोकांच्या मनातून गेलेली नाही.[] आणि या सत्य घटनेवर आधारित रझाकार नावाचा मराठी चित्रपट सुद्धा इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झाला.

मंदिरांना दान[संपादन | स्रोत संपादित करा]

निजामाने हिंदू आणि मुसलमानांना सारखीच वागणूक दिली असे सांगितले जाते. त्याने अनेक मंदिरांना वेळोवेळी सोने आणि पैसे दान केले.

निजाम यादगीरगुत्ता मंदिर या फायलींमधील राज्य अभिलेखांच्या नोंदीमवरून मीर उस्मान अली खान यांनी हे भद्राचलम मंदिराला ८२,८२५ रुपये आणि तिरुपती वेंकटेश्वर मंदिराला ते ५०,००० + ८ हजार रुपये दिले, असे दिसते. [][]

महाभारत के प्रकाशन में दान[संपादन | स्रोत संपादित करा]

पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला महाभारताची चिकित्सक आवृत्ती काढण्यासाठी सन १९३२ साली, सातवा निजाम, मीर उस्मान अली खान याने ११ वर्षांसाठी प्रतिवर्ष १,००० रुपयांच्या हप्त्यांनी एकूण ५०,००० रुपये दिले. [][]

शैक्षणिक सुधारणा[संपादन | स्रोत संपादित करा]

निजामाच्या हैदराबाद संस्थानातील शिक्षणाचे बजेट एकूण उत्पन्नाच्या सुमारे ११% होते. हे भारतातील कुठल्याही राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा कितीतरी जास्त आहे.

निजामाने मराठवाडा क्षेत्रात कृषी संशोधनाचा पाया घातला. १८ मे १९७२ रोजी ही योजनेचे रूपांतर मराठवाडा कृषी विद्यापीठात झाले. निजामाने दिलेल्या ५४ एकर जमिनीवर मराठवाडा विद्यापीठ बनले..[१०]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
AsafJah7 oath Rajpramukh 1950

शैक्षणिक संस्थांना देणग्या[संपादन | स्रोत संपादित करा]

निजामाने बनारस हिंदू विद्यापीठाला १० लाख रुपये व अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला ५ लाख रुपये देणगीदाखल दिले. [११]

उस्मानिया विद्यापीठ[संपादन | स्रोत संपादित करा]

पहा उस्मानिया विद्यापीठ

मीर उस्मान अली खानने उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठ आज भारतीय उपखंडातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. निजामाने शाळा, महाविद्यालये स्थापन केली आणि भाषांतरासाठी अनुवाद विभाग स्थापन केला. प्राथमिक शिक्षणही अनिवार्य आणि गरिबांसाठी विनामूल्य केले. [१२][१३]

भारत-चीन युद्ध प्रयत्न योगदान[संपादन | स्रोत संपादित करा]

इंडो-चिनी मतभेदांमुळे होणाऱ्या संभाव्य युद्धासाठी , निजामाला राष्ट्रीय संरक्षण निधीला योगदान देण्याची विनंती झाली. मीर उस्मान अली खानने त्यासाठी ५,००० किलो सोने दिले. भारतातील कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला हे सर्वात मोठे योगदान आहे. [१४]

पूर प्रतिबंधक उपाय[संपादन | स्रोत संपादित करा]

१९०८ सालच्या ग्रेट मुसी पुरात, अंदाजे ५०,००० लोक मरण पावले. निज़ामने आणखी मोठे पूर येऊ नयेत म्हणून उस्मान सागर आणि हिमायत सागर यांना रोखण्यासाठी दोन तलाव बांधले.

निजामाचे पूर्वीचे नाव उस्मान सागर, नंतर हिमायत सागर. त्याच्या मुलाचे नाव आझम जाह मीर हिमायत अली खान..[१५][१६][१७] .

मृत्यू आणि दफन[संपादन | स्रोत संपादित करा]

मीर उस्मान अली खानने २४ फेब्रुवारी १९६७रोजी किंग कोठी पॅलेस येथे शेवटचा श्वास घेतला. त्याचे दफन जुड़ी मस्जिदमध्ये झाले. ही मशीद १९३६ साली निजामाने आपल्या मुलाच्या-जवादाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृत्यर्थ बनवली होती. [१८]

निजामाचा अंत्यसंस्कार (तत्कालीन) भारतीय इतिहासातील सर्वात मोठा होता, असे निजाम संग्रहालयाच्या कागदपत्रांत म्हटले आहे. अंदाजे १ कोटी लोक" निजामांच्या गन-कार्टच्या जुलूसमध्ये सामील खाले होते. हे निजामाच्या लोकप्रियतेचे पुरावे म्हणायला हरकत नाही. भारताच्या इतिहासात निजामाचे दफन हा सर्वात मोठा गैर-धार्मिक, बिगर राजकीय प्रसंग होता. शोकाकुल लोकांची संख्या इतकी जास्त होती की हैदराबादचे रस्ते आणि फुटपाथ तुटलेल्या बांगड्यांनी भरले होते. (तेलंगणाच्या परंपरेनुसार, स्त्रिया त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या बांगड्या फोडतात.)[१९]

उस्मान अली खान यांचे नाव दिलेल्या संस्था आणि वास्तू[संपादन | स्रोत संपादित करा]

उस्मानिया युनिव्हर्सिटी, उस्मानिया जनरल हॉस्पिटल, उस्मानिया बिस्किटे, उस्मान सागर तलाव, उस्मानाबाद जिल्हा, वगैरे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी