क्रिकेट विश्वचषक, १९७९
साचा:Infobox cricket tournament १९७९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे दुसरे आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ९ जुन ते २३ जुन १९७९ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज तसेच श्रीलंका व कॅनडा या ८ संघांनी सहभाग घेतला. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.
प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीज ने अंतिम सामन्यात इंग्लंडला हारवून जिंकला.
वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिज याने सर्वाधीक धावा केल्या तर इंग्लंडच्या माइक हेंड्रिक्स याने सर्वाधिक गडी बाद केले.
स्पर्धा प्रकार संपादन
साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल
सहभागी देश संपादन
या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९७९ आय.सी.सी. चषक
| देश/संघ | पात्रतेचा मार्ग | सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या | मागील सहभाग स्पर्धा | मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी |
|---|---|---|---|---|
| साचा:Cr | यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य | २ | १९७५ | उपांत्य फेरी (१९७५) |
| साचा:Cr | आयसीसी संपूर्ण सदस्य | २ | १९७५ | उपविजेते (१९७५) |
| साचा:Cr | २ | १९७५ | गट फेरी (१९७५) | |
| साचा:Cr | २ | १९७५ | उपांत्य फेरी (१९७५) | |
| साचा:Cr | २ | १९७५ | गट फेरी (१९७५) | |
| साचा:Cr | २ | १९७५ | विजेते (१९७५) | |
| साचा:Cr | १९७९ आय.सी.सी. चषक | १ | पदार्पण | पदार्पण |
| साचा:Cr | २ | १९७५ | गट फेरी (१९७५) |
मैदान संपादन
| लंडन | साचा:Location map+ | लंडन |
|---|---|---|
| लॉर्ड्स क्रिकेट मैदान | द ओव्हल | |
| प्रेक्षक क्षमता: 30,000 | प्रेक्षक क्षमता: 23,500 | |
| नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही | नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही | |
| बर्मिंगहॅम | मॅंचेस्टर | |
| एजबॅस्टन मैदान | ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान | |
| प्रेक्षक क्षमता: 21,000 | प्रेक्षक क्षमता: 19,000 | |
| नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही | नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही | |
| नॉटिंगहॅम | लीड्स | |
| ट्रेंट ब्रिज मैदान | हेडिंग्ले मैदान | |
| प्रेक्षक क्षमता: १५,३५० | प्रेक्षक क्षमता: १४,००० | |
| नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही | नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही |
संघ संपादन
साखळी सामने संपादन
गट अ संपादन
साचा:मुख्यलेख साचा:१९७९ क्रिकेट विश्वचषक गट अ गुण साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
गट ब संपादन
साचा:मुख्यलेख साचा:१९७९ क्रिकेट विश्वचषक गट ब गुण
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
बाद फेरी संपादन
उपांत्य फेरी संपादन
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यू झीलंडमध्ये अटीतटीचा सामना झाला. पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडने ६० षटकात ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यू झीलंडने कडवी झुंज दिली परंतु न्यू झीलंडला ६० षटकात ९ गडी गमावून २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यू झीलंडचा ९ धावांनी पराभव करत इंग्लंडने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
वेस्ट इंडीजने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अधिपत्य गाजवत पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
अंतिम सामना संपादन
साचा:Main लॉर्ड्सवर २३ जून १९७९ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात अंतिम सामना झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात म्हणावी तसी सुलभ झाली नाही. गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, अल्विन कालिचरण आणि कर्णधार क्लाइव्ह लॉईड हे लवकर बाद झाल्यामुळे वेस्ट इंडीजची सुरुवातीची स्थिती ९९/४ अशी होऊन बसली. परंतु त्यानंतर व्हिव्ह रिचर्ड्स याच्या १३८ धावांच्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडीजने ६० षटकांमध्ये २८६ धावांपर्यंत मजल मारली.
वेस्ट इंडीजच्या २८६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर माइक ब्रेअर्ली आणि जॉफ्री बॉयकॉट यांनी संथगतीने फलंदाजीला सुरुवात केली. ३८ षटकांपर्यंत इंग्लंड फक्त १२९ धावांपर्यंत पोहोचू शकला. सलामीवीर बाद झाल्यानंतर इंग्लंड १८३/२ वर असताना क्रिकेट इतिहासात केवळ ११ धावात उर्वरीत ८ गडी बाद झाले. इंग्लंडचा डाव १९४ धावात संपुष्टात आला. वेस्ट इंडीजने सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला.
विक्रम संपादन
फलंदाजी संपादन
सर्वात जास्त धावा
- गॉर्डन ग्रिनीज (वेस्ट इंडीज) - २५३
- विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) - २१७
- ग्रहम गुच (इंग्लंड) - २१०
गोलंदाजी संपादन
सर्वात जास्त बळी
- एम हेन्ड्रिक्स (इंग्लंड) - १०
- बी जे मॅक्केचिनी (न्यु झीलंड) - ९
- आसिफ इक्बाल (पाकिस्तान) - ९
बाह्य दुवे संपादन
साचा:१९७९ क्रिकेट विश्वचषक साचा:क्रिकेट विश्वकप क्रम साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे