साचा:माहितीचौकट खेळाडू नीरज चोपडा हे भारतीय भालाफेकपटू आहेत. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत, त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके गोळा केली आहेत, २०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. []त्याने फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.

पार्श्वभूमी संपादन

नीरज चोप्राचा जन्म खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा येथे झाला. त्याचे शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली.

नीरज चोपडाचे मूळ आडनाव चोपडे आहे. चोपडे हरियाणातील पानिपत येथील रोड मराठा समाजातून येतात. रोड मराठा हा तोच समाज आहे जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर देखील हरियाणातल्या पानिपत सोनिपतकडच्या भागात वस्ती करून राहिला. []

कारकीर्द संपादन

2020 उन्हाळी ऑलिंपिक खेळ टोकियो संपादन

नीरज चोप्राने २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भला फेकून सुवर्णपदक जिंकले, हे भारतीय खेळाडूने जिंकलेले ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. आतापर्यंत वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा फक्त दुसरा भारतीय आहे. ह्या आधी ११ ऑगस्ट २००८ रोजी अभिनव बिंद्राने २००८ च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

२०१८ राष्ट्रकुल खेळ संपादन

साचा:मुख्य २०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.[]

२०१८ आशियाई खेळ संपादन

साचा:मुख्य २०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.[] या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान त्यांना मिळाला.[] आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले.[]

पुरस्कार संपादन

  • २०१८ मध्ये भारत सरकारतर्फे नीरजला अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
  • २०२१ मध्ये नीरजला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.[]
  • २०२२ मध्ये नीरजला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.[]

साचा:संदर्भनोंदी