Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शिव स्मारक - मराठीपिडिया

शिव स्मारक किंवा छ. शिवाजी महाराज स्मारक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुंबईत बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगांव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आधारासह एकूण उंची २१२ मीटर असणार आहे. चीनमधील २०८ मीटर उंचीच्या स्प्रिंग टेंपल बुद्धापेक्षा याची उंची वाढवण्यात आली आहे.[] या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
छत्रपती शिवाजी महाराज

इतिहास संपादन

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिव स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता.[] २०२१ पर्यंत याचे काम पूर्ण होईल, हा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे.

वैशिष्ट्ये संपादन

स्मारकाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.[]

  • १६.८६ हेक्टर क्षेत्रफाच्या खडकावर स्मारक निर्माण केले जाईल. हे स्थळ गिरगांव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर, नरिमन पॉईंटपासून २.६ किलोमीटर, तर राजभवनपासून १.२ किलोमीटर अंतरावर असेल.
  • स्मारकाची तटबंदीला भिंत असेल, आत प्रवेश केल्यावर तुळजा भवानीचे एक मंदिर राहील.
  • शिवाजी महाराज यांच्या जीवनातील दृश्ये दाखवणारे देखावे असतील. कलासंग्रहालय आणि ग्रंथालयसुद्धा असेल.
  • याला एकूण ३,६०० कोटी रुपये खर्च लागणार आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी