अंजनगाव सुर्जी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

अंजनगाव सुर्जी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक मोठी आणि पहिली नगरपालिका आहे तसेच तालुका, व तालुक्याचे शहर आहे. येथे ३० डिसेंबर १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होेता, हा तह इतिहासात 'अंजनगावसुर्जी तह' म्हणून प्रसिद्ध आहे.

पैठणमधील सुप्रसिद्ध सत्पुरुष थोर संत श्री एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री देवनाथ महाराज (यांचा जन्म अंजनगाव येथेच झाला होता) यांनी येथे १७५४ साली श्री देवनाथ मठ स्थापन केला. त्याच परंपरेतील १८ वे महापुरुष श्री मनोहरनाथ महाराज ( कार्यकाळ - इ.स. १९६० ते इ.स. २०००) यांनी स्वतःच्या कारकिर्दीत हिंदु धर्माची ध्वजा फडकती ठेवली. सर्वश्री दत्तात्रेय तथा नृसिंहसरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंद, कृष्णनाथ, विश्वंनाथ, मुरारनाथ, रंगनाथ, गोपाळनाथ, गोविंदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरुपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ , मनोहरनाथ विद्यमान पीठाधीश श्री जितेन्द्रनाथ, ही शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची शिष्यपरंपरा. [१]


साचा:विस्तार साचा:अमरावती जिल्ह्यातील तालुके