अंधाधुन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट अंधाधुन एक २०१८ सालचा विनोदी व रोमांचक चित्रपट आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शिन केले असुन वायाकॉम१८ मोशन पिक्चर्सद्वारे याची निर्मिती आहे. या चित्रपटात तब्बू, आयुष्मान खुराणा आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. एका पियानो वादकाची ही कथा आहे जो एका चित्रपट अभिनेत्याच्या हत्येमध्ये अजाणतेपणाने गुंतला जातो.

चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ रोजी चित्रपटगृहात झळकला. समीक्षकांनी चित्रपटचे लिखाण व खुराणा आणि तब्बू यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. चित्रपटाने चार स्क्रीन पुरस्कार, चार झी सिने पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार व तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. हा चित्रपट ₹३२ कोटीच्या बजेटवर तयार झाला होता आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹४५६ कोटी पेक्षा जास्त कमाई केली.[१][२]

कथानक

आकाश (आयुष्मान खुराणा) एक पियानो वादक असतो जो सोफीला (राधिका आपटे) भेटतो. ओळखीतून लवकरच त्यांच्यात जिव्हाळ्याचे प्रेमसंबंध बनवतात. आकाशच्या प्रतिभेने सोफी प्रभावित होते. एक निवृत्त अभिनेता, प्रमोद सिन्हाचे (अनिल धवन), आकाशकडे लक्ष वेधते आणि आपल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम सादर करण्यासाठी तो त्याला आमंत्रित करतो. आकाश सिंहासच्या फ्लॅटवर तेतो आणि प्रमोदची पत्नी सिमी (तब्बू) दरवाजा उघडते. आकाश अंधळा आहे याची खात्री पटवून सिमी त्याला पियानो वाजवण्यास सांगते. आकाश जनळच प्रमोदचा मृतदेह बघतो, पण अज्ञानाची नक्कल करत तो पियानो वाजवतो. तो बाथरूममध्ये लपून बसलेला मनोहरला (मानव विज) पाहतो; ज्याचे सिमीशी प्रेमसंबंध आहेत. आकाश पियानो वाजवत असताना सिमी आणि मनोहर मृत शरीर सूटकेसमध्ये भरतात.

आकाश हत्येचा अहवाल देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला मनोहर पोलीस असल्याचे समजते. दरम्यान, सिमी तिच्या वृद्ध शेजारीणीला पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना ऐकते आणि तिला पण ठार मारते. जेव्हा सिमी आकाशच्या कॉफीमध्ये विष ओतते आणि त्यावर बंदूक रोखते, तेव्हा आकाश खरं सांगतो कि तो अंधळा नाही. पण सिमी त्याला विष पाजते व तो अंधळा होतो. दुसरीकडे सोफीला पण समजते की आकाश इतके दिवस नाटक करत होता. गुंगी मधून तो उठतो तेव्हा तो एका बेकायदेशीर अवयव रोपण चिकित्सालयामध्ये जागा होते. आकाशची कथा ऐकून डॉ. स्वामी (झाकीर हुसेन) आणि त्याचे सहाय्यक मुरली आणि सखू आकाशला वाचवण्याचा निर्णय घेतात आणि त्याला नवीन डोळे देण्याचे पण ठरवतात. अनेक घडामोडी मध्ये मनोहर आणि सिमी मारले जातात.

दोन वर्षांनंतर सोफीला आकाश भेटतो, जो अजूनही आंधळा असतो. आकाशने तिला संपूर्ण कहाणी सांगितल्यानंतर, सोफी आकाशला सांगतो की, त्याने डॉ. स्वामींकडून स्वतःची दृष्टी परत घ्यावी. शांतपणे, आकाश तिथून निघतो आणि आपल्या छडीचा उपयोग करून वाटेतली एक बाटली उडवतो.

निर्माण

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा कडून आयुष्मान खुराणाने या चित्रपटाविषयी ऐकले आणि त्यावर काम करण्यास रस असल्याचे दाखवून राघवनशी संपर्क साधला. देहबोलीत काय फरक पडेल हे मला बघण्यास राघवनने दोन चाचण्या घेतल्या ज्यामध्ये नायक आंधळा आसण्याचे नाटक करतो आणि जेव्हा तो खरोखर आंधळा असतो. चित्रपटात पियानो वाजवणाऱ्या खुराणाने अनेक अंध विद्यार्थ्यांना भेट दिली आणि ते कसे आपले हात चालवता हे पाहिले.[३] खुराणा यांनी लॉस एंजेलिसमधील पियानो वादक अक्षय वर्मा यांच्याखाली दररोज चार तास पियानोचा अभ्यास केला आणि चित्रपटात त्याने बॉडी डबल वापरली नाही.[४] त्याने यास आपल्या कारकिर्दीतील "सर्वात आव्हानात्मक भूमिका" म्हटले आहे.[५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट