अकोला किल्ला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला अकोला शहरातील हा भुईकोट किल्ला असदगड नावाने ओळखला जातो. हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखॉंच्या देखरेखीखाली १६९८ मध्ये बांधून पूर्ण केला (ईदगाह वरील शिलालेख). हा खरे तर किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा बुरूज आहे. या तटबंदीस कधीकाळी असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अगरवेस बुरूज असे एकूण तीन बुरूज होते, त्यांतील पहिले दोनच शिल्लक आहेत. असद बुरूजालाच असदगड म्हणून ओळखले जाते. तटबंदीस पूर्वी दहीहंडा वेस, अगर वेस, गंज वेस आणि शिवाजी किंवा बाळापूर वेस असे चार दरवाजे होते. त्यांपैकी पहिले दोन दरवाजे शिल्लक आहेत. यांतील अगर वेस ही गोविंद आप्पाजी याने १८४३ साली बांधली. असद बुरूजावर हवामहल म्हणून एक अर्धवट पडकी इमारत आहे. ह्या इमारतीत असदखॉं राहात असावा.