अकोला विमानतळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox Airport अकोला विमानतळसाचा:विमानतळ संकेत हे महाराष्ट्र राज्याच्या अकोला शहरातील विमानतळ आहे. यास 'शिवणी विमानतळ' या नावाने देखील ओळखले जाते कारण ते अकोल्याच्या पूर्वेस असलेल्या शिवणी या गावात स्थित आहे.हे विमानतळ महाराष्ट्रातील २६ विमानतळांपैकी एक आहे.

या विमानतळाची स्थापना १९४३ साली झाली.प्रथमतः याच्या धावपट्टीची लांबी ९०० मीटर होती. २००९चे दरम्यान ती लांबी १४०० मीटर करण्यात आली.[१]

विमानसेवा व गंतव्यस्थान

सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही. सध्या ह्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून त्यासाठी तेथील कृषी विद्यापिठाची ६० एकर जमिन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.[२] त्यासाठी विद्यापीठ व बाजुच्या गुढधी, शिवर, बाभूळगाव इ. गावातील जमिनी घ्याव्या लागतील. हे विस्तारिकरण झाल्यास अकोला, यवतमाळ, वाशिम,बुलढाणा, हिंगोली इ. जिल्ह्याना त्याचा फायदा होईल.

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:भारतातील विमानतळ

साचा:विस्तार