अक्षीचा शिलालेख

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अक्षीचा शिलालेख हा शा.श. ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ मधील मराठीतील पहिला शिलालेख आहे [१]. हा शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील अलिबाग-चौल रस्त्यावरील अक्षी या गावात आढळलेला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे [२][३].

स्वरूप

अक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे.

शिलालेख

राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२



गीं सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्राधिपती । स्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भईर्जू सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु: ९३४ प्रधा-
वी सवसरे: अधिकू दीवे सुक्रे बौ-
लु । भईजुवे तथा बोडणा तथा नऊ
कुवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचली ज-

शिलालेखाचा अर्थ

जगी सुख नांदो.पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती, श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. लुनया कचली

मागोवा

साचा:Cquote

पूर्वी हा ‘दगड’ रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. आज तो अक्षी ग्रामपंचायतीशेजारी उभा आहे. [४]

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

   या दोन  शिलालेखांव्यतिरीक्त अजून काही पूरावे सापडतात का शोधही घ्यायला हवा. 
   कारण हे ईथे कसे आले हे समजत नाही. आक्षीचं इतर काही  ऐतिहासिक  महत्त्व किंवा  पूरावा नाही. 

{{विस्तव