अचला
अचला किल्ला हा अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे किंवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापुतारा मार्गे देखील जाता येते.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मुघलांना चकवा देण्याकरिता खजिना दोन भागात विभागला गेला त्यागील एक भाग हा गोंदाजी नारायण या मराठा सरदाराने खजिना या किल्ल्यात लपविल्याची आख्यायिका आहे . Ab साचा:विस्तार-किल्ला
छायाचित्रे[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावरील ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]
गडमाथा अत्यंत अरुंद आहे. गडावर फारसे पाहण्यासारखे काही अवशेष नाहीत. गडावर पण्याची एक-दोन टाकी आहेत. याशिवाय भग्नावस्थेत असणारे एक मंदिर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]
नाशिकमार्गे वणी गाठावे. वणीहून एस.टी. ने पिंपरी-अचलाकडे जावे. हे अंतर साधारणपणे १२ कि.मी.चे आहे. अचला गावात उतरून पिंपरीपाडा गावाकडे सरळ चालत जावे. हे अंतर अर्धा तासाचे आहे. पिंपरीपाडा हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावासमोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत एक छोटेसे देऊळ दिसते त्याच्या दिशेने वर चढत जावे. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. ही वाट पुढे कडा डावीकडे ठेवून त्याला चिटकून वर जाते. पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. खिंडीतून माथा गाठण्यास अंदाजे दीड तास पुरतो.
गडावरील राहायची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावरील खाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावरील पाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]
मार्ग[संपादन | स्रोत संपादित करा]
जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)