अजय जडेजा
साचा:संदर्भहीन लेख साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
अजयसिंगजी दौलतसिंगजी जडेजाचा जन्म १ फेब्रुवारी १९७१ रोजी जामनगर, गुजरात येथे एका राजपुत कुटूंबात झाला.अजय १९९२ ते २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाकडुन नियमीत खेळला. अजयने भारतासाठी १५ कसोटी व १९६ एकदिवसीय सामने खेळले. अजयच्या क्रिकेटमधील कारकीर्द त्याच्यावरिल मॅच फिक्सिंगमुळे ५ वर्षाच्या बंदीने झाकोळली गेली. नंतर दिल्ली उच्च न्यायलयने २७ जानेवारी २००३ रोजी त्याच्यावरील बंदी उठवली.
बालपण[संपादन | स्रोत संपादित करा]
जडेजाचा जन्म नवानगर (आत्ताचे जामनगर) येथे राजपुत परिवारात झाला, ज्याला के.एस.रणजीतसिंगजी, के.एस. दुलीपसिंगजी सारख्या क्रिकेटमधिल दिग्गजांचा इतिहास लाभला आहे.
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
जडेजा १९९२ ते २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघात नियमीतपणे खेळला. यामधे १५ कसोटी व १९६ आंतरराष्ट्रिय एक दिवसीय सामन्यात खेळला. या कालावधीत तो भारतीय संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. जडेजाने मोहम्मद अझरुद्दिन सोबत चौथ्या व पाचव्या विकेटसाठीचा सर्वोच्च भागिदारीचा विक्रम केला आहे, जो त्यांनी अनुक्रमे झिंबाब्वे व श्रीलंकेविरुद्ध खेळताना बनवला आहे.