अत्रि

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट हिंदू संतअत्रि हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षीं(Great Bear, Ursa Major, Big Dipper)मध्ये अत्रि(Delta Ursae Majoris) हा एक तारा आहे.अत्रि हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात[१]

अत्रि ऋ़षींचा आश्रम राजगढ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या निर्विंध्या नदीकिनारी होता.

अत्रि शब्दाची व्युत्पत्ती

. भृगू (भ्राज् धातू म्हणजे अग्नीवर भाजणे) आणि अग्निरस (अग्नीतून निर्माण होणारा ज्वलनशील कोळसा) या शब्दांवरून अत्रि या शब्दाची व्युत्पत्ती अधिक स्पष्ट होते. अत्रींच्या जन्माचे निरुक्त आणि बृहददेवता यांमध्ये झालेले उल्लेख, बाकी कथांच्या मानाने अपूर्ण वाटणारे आहेत. अत्रिन् (नष्ट करणारे) हा शब्द वेदांत देवांचे शत्रू या अर्थानेही येतो, परंतु प्रत्यक्षात अत्रि हे देवांचे साहाय्यकर्ते सप्तर्षी होते हे समजून, अत्रि या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला गेला आहे.

अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे म्हणजे स्थानिक असा होतो. प्रजापतीने केलेल्या वाक्‌यज्ञात भृगू आणि अग्निरस ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्यानंतर अत्रींचा जन्म झाला. शौनकरचित बृहददेवता या ग्रंथानुसार वाक्(सरस्वती?) ही तिसऱ्या पुत्राची आशा करताना हा प्रश्न करते. तर अत्रि शब्दाच्या निरुक्तातील व्युत्पत्तीनुसार ‘तीन नाहीत’अशी पृच्छा स्वतः नवजात भृगू आणि अग्निरसच करतात.[२]

नष्ट करणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या समानोच्चारी अद् या धातूपासून येणाऱ्या अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय (जिव्हा) असा होतो. वाक्ची निर्मिती मुखातून होते. अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय. त्यामुळे अत्रि शब्दाच्या व्युत्पत्तीमध्ये, या शब्दाचा मुखाशी संबध असेल का असा प्रश्न केला जातो.

(अत्त्री साचा:वैदिक संस्कृतमधील शब्द; जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका. या शब्दाचा अर्थ संसभाषण संस्कृत शब्दकोशात ‘नष्ट करणारा’ असा दिला आहे)आपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु- (trasnu)अत्रस्त-अत्रास यापासून अत्रि म्हणजे Fearless अशी व्याख्या देते[३]

ऋक्ष(म्हणजे अस्वल) या शब्दाचा अर्थ (इंग्रजी bear) आकाशात दिसणाऱ्या (Great Bear) सप्तर्षी हा तारकापुंज असाही आहे. सप्तर्षींमधले बाकीचे तारे जोडीने असतात तर अत्री नावाचा तारा एकटाच असतो.


हे सुद्धा पहा

चांदण्यांची नावे

संदर्भ यादी

http://santeknath.org/guru%20parampara.html साचा:मृत दुवा

साचा:सप्तर्षी