अनिता बोस फाफ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती अनिता बोस फाफ (इंग्रजी:Anita Bose Pfaff) (जन्म:२९ नोव्हेंबर, १९४२) ह्या एक ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसेच त्या ऑग्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक तसेच जर्मनीच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीमधील राजकारणी देखील आहेत.[१] फाफ या भारतीय राष्ट्रीय नेते स्व. सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी, स्व. एमिली शेंकल यांची मुलगी आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो या बॉलिवूड चित्रपटात फाफ यांचा उल्लेख आहे.[२]

प्रारंभिक जीवन

फाफ यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी एमिली शेंकल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पोटी व्हियेना, ऑस्ट्रिया येथे झाला. सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिश सरकार विरुद्ध युद्ध करण्यासाठी जेव्हा आशियात परतले तेव्हा फाफ या केवळ चार महिन्यांच्या होत्या. फाफचे संगोपन त्यांच्या आईने आणि आजीने केले. फाफच्या नावामागे त्यांच्या वडिलांचे बोस हे आडनाव दिले गेले नाही. त्यांचे संगोपन अनिता शेंकल नावाने झाले.[३] इ.स. २०१२ पर्यंत, फाफ ने ऑग्सबर्ग विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.[१]


फाफचे प्रोफेसर मार्टिन फाफ सोबत लग्न झाले होते. मार्टिन हे पूर्वी सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचेचे प्रतिनिधित्व करणारे जर्मन संसदेचे सदस्य होते. त्यांना तीन मुले आहेत: पीटर अरुण, थॉमस कृष्णा आणि माया कॅरिना.[४]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

  1. Subhash Chandra Bose Wife Story
  2. Anita Bose-Daughter of SC Bose speaks