अनू आगा
Appearance
अर्नवाझ अनू आगा (जन्म : मुंबई, इ.स. १९४२) या भारतीय उद्योगपती आणि समाजसेविका आहेत. या थरमॅक्स लिमिटेड कंपनीच्या चेअरमन होत्या.[१][२] २००७मध्ये या भारतातील सर्वात धनाढ्य आठ महिलांपैकी एक आणि ४० धनाढ्य भारतीयांपैकी एक होत्या.
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
आगा या सन १९८५मध्ये थरमॅक्स कंपनीत दाखल झाल्या. १९९१-९६ दरम्यान त्या तेथील मनुष्यबळ विभागाच्या मुख्याधिकारी होत्या. त्यांचे पती रोहिंटन आगा यांच्या १९९६ मधील मृत्यूनंतर अनू आगा यांनी थरमॅक्सचे चेअरमनपद घेतले. अनू आगा यांच्या निवृतीनंतर त्यांची मुलगी मेहेर पदमजी या चेअरमन झाल्या.
निवृत्तीनंतर अनू आगा यांनी सामाजिक कार्यात रस घेण्यास सुरुवात केली. त्या टीच फॉर इंडिया या संस्थेच्या चेअरमन आहेत. त्या भारतीय राज्यसभेच्या नियुक्त सभासद असून समाजसेवेशी निगडित अश्या राज्यसभेतील अनेक समित्यांवर त्या काम करतात.