अफझलखान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन साचा:विस्तार

साचा:माहितीचौकट व्यक्ती

अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने [[शिवाजी]महाराजांन]विरुद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली.[१][२]

ऐतिहासिक नोंदींमध्ये त्यांचे नाव "अफझूल खान" असेही आढळते.[३]

सुरुवातीचे जीवन

अली अदिल शाह दुसरा, ज्याने अफझल खानची विजापूरचा सरदार म्हणून नियुक्ती केली

विजापुर सल्तनतच्या अली आदिल शाह दुसराच्या काळात अफझल खान एक प्रमुख सरदार होता. त्याच्या सशक्त कौशल्याने आणि हुकमती क्षमतेने त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्याने दरबारात उच्चपद प्राप्त केले. असे म्हटले जाते की त्याला अदिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध तलवारीने सन्मानित करण्यात आले होते, ही तलवार हिऱ्यांनी भरलेली होती. अफजल खानला "ढाल-गज" नामक अत्यंत लोकप्रिय अशी हत्तीची अंबारी देण्यात आली होती. त्याने १०,००० सैनिकांची वैयक्तिक फौजेचे नेतृत्व केले.[४]

मराठ्यांविरुद्ध युद्ध

१६५९ मध्ये, अफझलखानने ४०,००० सैन्य उभारले आणि शिवाजी महाराजांचा सातत्याने पाठपुरावा केला. ह्या सैन्याने अनेक जणांची कत्तल केली, यामुळे शिवाजी महाराजांच्या सैन्याला डोंगराळ किल्ल्यांत आश्रय घ्यावा लागला.[५] शिवाजी महाराजांना खुल्या मैदानात येणे भाग पडावे, याकरता त्याने हिंदूंच्या अनेक पवित्र स्थळांची नासधूस केली. त्यांमध्ये मराठ्यांचे महत्त्वाचे तीर्थस्थान पंढरपूरचा सुद्धा समावेश होता. विजापुरी सैन्याचे असे वागणे हे प्रथमच घडत होते, ज्यामुळे आदिलाशहाला देशमुखांशी (वतनदार) वैर पत्करावे लागले.[६] अफजलखानाने तुळजापूरसुद्धा काबीज केले. आदिलशाही सैन्याने हिंदूंची देवी तुळजाभवानीची मूर्ती उद्ध्वस्त केली.[७]

अफजलखानची प्रारंभिक योजना म्हणजे शिवाजी महाराजांचे मूळ निवास पुण्यावर आक्रमण करणे.[१] खुल्या मैदानात खानाच्या फौजेसमोर आपला टिकाव लागणार नाही हे शिवाजी महाराज ओळखून होते, त्यामुळे त्यांनी जावळीच्या घनदाट जंगली परिसरातील प्रतापगडावर आश्रय घेतला. शिवाजी महाराज्यांच्या सैन्याने या प्रांगणात उत्कृष्ट कामगिरी केली व त्यामुळे आदिलशाही सैन्याच्या तोफा, बंदुका, हत्ती, घोडे आणि उंट यांना प्रभावहीन बनविले.[१]

अफझलखान अतिशय निर्दयी, क्रूर आणि कपटी सरदार होता. दगा करून हत्या करत असे. शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूची-संभाजीची कपट करून त्यानेच हत्या घडवून आणली. थोरल्या संभाजी महाराजाची समाधी कर्नाटकातील कणकगिरी (जिल्हा कोप्पल) येथे आहे.

इतिहासात प्रथमच वाघनखे वापरून माणसाची हत्या झाली.

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी साचा:मराठा साम्राज्य