अब्दुल वहीद खान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट गायक उस्ताद अब्दुल वहीद खान उर्फ बेहरे वहीद खान (१८७१ -१९४९) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक नामवंत गायक असून त्यांनी उस्ताद अब्दुल करीम खान सोबत मिळून प्रख्यात किराणा घराण्याची स्थापना केली.[१][२][३]

इ.स. १८५७ च्या पराभवानंतर मुघल सत्तेचा अंत झाला. राजदरबारातील गायक असलेले अनेक घराणे तेव्हा दिल्लीहून उत्तर प्रदेश मधील कैराना येथे स्थलांतरित झाले. त्यात वहीद खान यांचे आई-वडील सुद्धा होते. इ.स. १८७१ मध्ये कैराना येथे वहीद खान यांचा जन्म झाला. वयाच्या बारा वर्षांपर्यंत वहीद खान यांनी त्यांचे वडील उस्ताद अब्दुल माजीद खान यांच्याकडून सारंगी वादन आणि शास्त्रीय गायनाचे धडे शिकले. बाराव्या वर्षी ते कोल्हापूर येथील उस्ताद लंगडे हैदर बक्ष खान यांच्याकडे पुढील गायकी शिकण्यासाठी गेले.[१]

शिष्य

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:हिंदुस्तानी संगीत