अमिताभ बच्चन
साचा:माहितीचौकट अभिनेता/temp अमिताभ बच्चन (जन्म : ११ ऑक्टोबर १९४२)[१] हे एक भारतीय चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते, दूरदर्शन सूत्रसंचालक, माजी राजकारणी आहेत जे त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.[२] १९७०-८० च्या दरम्यान, ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेते होते ; फ्रेंच दिग्दर्शक फ्रँकोइस ट्रूफॉट यांनी त्यांना "One-man industry" (एक-पुरुष उद्योग) म्हटले.[३]
अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील किरोरी माल महाविद्यालयात झाले. १९६९ मध्ये भुवन शोम या चित्रपटात आवाज निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांसाठी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधले गेले.
अमिताभ यांना बॉलीवूडचा शहेनशाह (त्यांच्या 1988 मधील शहेनशाह चित्रपटाच्या संदर्भात), महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम, किंवा बिग बी म्हणून संबोधले गेले.[४] त्यांनी पाच दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत[५] 200हून अधिक भारतीय चित्रपटात काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी एकूण १६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, तसेच एकूण ४२ नामांकनांसह, फिल्मफेअरमधील कोणत्याही प्रमुख अभिनय श्रेणीमध्ये ते सर्वाधिक नामांकित कलाकार आहेत.
अभिनयासोबतच बच्चन यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माता आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी गेम शो "कौन बनेगा करोडपती"चे अनेक सीझन होस्ट केले आहेत. १९८० च्या दशकात त्यांनी काही काळ राजकारणातही प्रवेश केला होता.
भारत सरकारने त्यांना कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान, "नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.
भारतीय उपखंडाच्या बाहेर त्यांचे आफ्रिका (दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस), मध्य पूर्व (विशेषतः यूएई आणि इजिप्त), युनायटेड किंगडम, यासह दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चाहते आहेत. रशिया, कॅरिबियन (गियाना, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो), ओशनिया (फिजी, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड) आणि युनायटेड स्टेट्स येथेही खूप मोठ्या प्रमाणात बच्चन यांचे चाहते आहेत.[६]
प्रारंभीचे जीवन संपादन
अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.साचा:संदर्भ हवा
हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.साचा:संदर्भ हवा
बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला. मन का होतो अच्छा मन काना होतो जादा अच्छा.साचा:संदर्भ हवा
अभिनेता संपादन
निर्माता संपादन
- तेरे मेरे सपने, हिंदी चित्रपट (१९९६)
- मृत्युदाता, हिंदी चित्रपट (१९९७)
- मेजर साब, हिंदी चित्रपट (१९९८)
- अक्स, हिंदी चित्रपट (२००१)
- विरुद्ध... फमिली कम्स फर्स्ट, हिंदी चित्रपट (२००५)
- फमिली: टाइज ऑफ़ ब्लड, हिंदी चित्रपट (२००६)
पार्श्वगायक संपादन
- मी. नटवरलाल, हिंदी चित्रपट (१९७९)
- लावारिस, हिंदी चित्रपट (१९८१)
- नसीब, हिंदी चित्रपट (१९८१)
- सिलसिला, हिंदी चित्रपट (१९८१)
- महान, हिंदी चित्रपट (१९८३)
- पुकार (१९८३)
- तूफ़ान, हिंदी चित्रपट (१९८९)
- जादूगर, हिंदी चित्रपट (१९८९)
- खुदा गवाह, हिंदी चित्रपट (१९९२)
- अक्स, हिंदी चित्रपट (२००१)
- कभी ख़ुशी कभी ग़म, हिंदी चित्रपट (२००१)
- ऑंखें, हिंदी चित्रपट (२००२)
- अरमान, हिंदी चित्रपट (२००३)
- बागबान, हिंदी चित्रपट (२००३)
- देव (२००४)
- एतबार, हिंदी चित्रपट (२००४)
- बाबुल, हिंदी चित्रपट (२००६)
- निशब्द, हिंदी चित्रपट (२००७)
- चीनी कम, हिंदी चित्रपट (२००७)
दूरवित्रवाणी संपादन
- कौन बनेगा करोड़पति (२०००-२००५) .... संचालक
- कॉफी विथ करन (२००५) ..... पाहुणा कलाकार
- रांदेव्हू विथ सिमी गरेवाल (२००६) .... पाहुणा कलाकार
- टायटन अंताक्षरी (२००७) .... पाहुणा कलाकार
चित्रपट संपादन
साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
बाह्य दुवे संपादन
http://static.bafta.org/files/amitabhbachchanbrochure-82.pdf