अरविंद गुप्ता

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ

अरविंद गुप्ता काड्यापेटीपासून मॉडेल बनवायला शिकवत असताना

अरविंद गुप्ता ( ४ डिसेंबर १९५३) [१] हे एक भारतीय संशोधक आहेत. टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. गुप्ता मूळचे उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहेत.[२]

शिक्षण

गुप्ता यांचे आई वडील अशिक्षित आहेत. वडिलांचा साबण बनवण्याचा कारखाना होता. आईने शालेय शिक्षण घेतलेले नाही. गुप्ता लहानपणी विविध वस्तूंची खेळणी बनवत असत. त्यासाठी आईने त्यांना प्रोत्साहन दिले.[२]

पुढे गुप्ता यांनी आय.आय.टी. कानपूर मधून विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतली. तेथे शिक्षण घेत असतानाच ते खाणावळीतील कर्मचाऱ्यांच्या आणि सफाई कामगारांच्या गरीब मुलांना शिकवण्याचे कामसुद्धा करत होते.[३] शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील टाटा मोटर्समध्ये पाच वर्षे काम केले.[४]

कारकीर्द

१९७८ मध्ये मध्य प्रदेशातील हुशंगाबाद इथे हुशंगाबाद विज्ञान अध्यापन प्रकल्पात ते सहभागी झाले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या वस्तूपासून व टाकाऊ वस्तूंपासून साधी वैज्ञानिक खेळणी बनवण्याची कल्पना त्यांना येथे असताना सुचली.[३] अशा खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना विज्ञानाची गोडी लावता येईल आणि विज्ञान लोकप्रिय करता येईल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारची अनेक खेळणी बनवली. त्याबद्दल पुस्तके लिहिली. अशी वैज्ञानिक खेळणी कशी बनवावीत, याच्या ध्वनिचित्रफिती त्यांनी भारतातील विविध भाषांमध्ये तयार केल्या. http://www.arvindguptatoys.com/ या त्यांच्या संकेतस्थळावर त्यांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त स्वरूपात त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
गुप्ता यांनी २००३-२०१४ या काळात पुण्यातील आयुका येथे मुलांसाठीच्या विज्ञान केंद्रात काम केले.[५]

त्यांनी ३५ वर्षांच्या कालखंडात ३०००पेक्षा जास्त शाळा आणि संस्थांमध्ये मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी विज्ञान विषयक कार्यशाळा घेतल्या.[६]

१९९७-९८ मध्ये ते नॅशनल बुक ट्रस्टच्या नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन्स लिटरेचरचे सल्लागार होते. विज्ञान शिक्षणाबाबतचे युनेस्कोचे सल्लागार म्हणून त्यांनी विविध दक्षिण आशियाई देशांतील शिक्षकांसाठी बँकॉक (१९८८) आणि माले (१९९०) येथे कार्यशाळा घेतल्या.[१]

पुस्तके

  • गुप्ता यांनी लिहिलेले पहिले पुस्तक काड्यापेटीपासून बनवलेली मॉडेल्स आणि इतर शास्त्रीय प्रयोग १२ भाषांमध्ये छापण्यात आले.
  • पानांचे प्राणी
  • ग गणिताचा - गणितातील गमती[७]
  • खिलौनों का खजाना[८]
  • कचरे का कमाल[९]
  • अतीत के प्रेरक भारतीय वैज्ञानिक[१०]
  • हाथ के साथ
  • नन्हे खिलौने[११]
  • गणित की गतिविधियॉं (अनुवादित)
  • अपने हाथ गणित[१२]
  • सौर ऊर्जा की कहानी[१३]
  • मेरी दस उंगलियाँ[१४]
  • दोरी के खेल

पुरस्कार

  • महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार (२०१८)[१५]
  • पद्मश्री पुरस्कार (२०१८)[१६]
  • आयबीएन लोकमत प्रेरणा पुरस्कार (२०१४)

बाह्य दुवे

अरविंद गुप्ता ह्यांची वैज्ञानिक खेळणी, पुस्तके आणि इतर वाचनसामग्री ह्यांचे संकेतस्थळ

साचा:संदर्भनोंदी