अरुण जेटली

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट व्यक्ती

अरुण जेटली (जन्म : २८ डिसेंबर १९५२; - २४ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते.. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २०००मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.[१]

वैयक्तिक जीवन

त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्ली येथील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये १९६०-६९ च्या दरम्यान झाले. १९७३ मध्ये त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून ते कायद्याची परीक्षा पास झाले.. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. अरुण जेटली यांनी २४ मे १९८२ रोजी संगीता जेटलीशी लग्न केले. त्यांना दोन मुले, मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली. अरुण जेटली यांचे २४ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी १२.०७ वाजता निधन झाले.

भारताची सोळावी लोकसभा

१६व्या लोकसभेच्या कारकिर्दीत (सन २०१४ ते २०१९ या काळात) अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

वकिली

जानेवारी १९९० मध्ये अरुण जेटली यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नेमले गेले. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.[२]

पुरस्कार

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[३]

संदर्भ

साचा:संदर्भयादी