अर्चना शर्मा (वनस्पतिशास्त्रज्ञ)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती

अर्चना शर्मा ह्या एक प्रसिद्ध भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ, सायटोजेनेटिस्ट, सेल बायोलॉजिस्ट आणि साइटोटोक्सिकोलॉजिस्ट होत्या.[१] त्यांच्या मान्यताप्राप्त योगदानामध्ये वनस्पतीजन्य पुनरुत्पादक वनस्पतींमध्ये विशिष्टतेचा अभ्यास, प्रौढ केंद्रकात पेशी विभाजनाचा समावेश, वनस्पतींमध्ये विभक्त ऊतकांमध्ये पॉलीटेनीचे कारण, फुलांच्या वनस्पतींचे साइटोटॅक्सोनॉमी आणि पाण्यात आर्सेनिकचा प्रभाव यांचा समावेश आहे.[२]

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

अर्चना शर्मा यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३२ रोजी पुणे येथे झाली. तिचे कुटुंब शिक्षणतज्ज्ञांचे होते. ज्यात बिकानेर येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक एन.पी. मुखर्जी यांचा समावेश होता.[३] तिचे सुरुवातीचे शिक्षण राजस्थानमध्ये झाले. त्यानंतर तिने बीएससी बिकानेरहून केली. स.न. १९५१ मध्ये कलकत्ता विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात एम्.एस्.सी केली.अर्चना शर्मा यांनी पीएचडी १९५५ मध्ये पूर्ण केली आणि डी.एस.सी १९६० मध्ये पूर्ण केली. त्यांनी सायटोजेनेटिक्स, ह्यूमन जेनेटिक्स आणि एन्व्हायर्नमेंटल म्यूटेजेनेसिस मध्ये डी.एस.सी केली. परिणामी, कलकत्ता विद्यापीठात डीएससी मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. .

कारकीर्द

स.न्.अ १९६७ मध्ये, शर्मा कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सामील झाले, नंतर १९७२ मध्ये कलकत्ता विद्यापीठातील सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज इन सेल आणि क्रोमोसोम रिसर्चमध्ये जेनेटिक्सचे प्राध्यापक झाल्या. स.न. १९८१ मध्ये, त्यांना वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली, त्यानंतर १९८३ मध्ये प्राध्यापक हे पद मिळाले.

त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी ७० पेक्षा जास्त पीएच.डी. करणाऱ्या विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले. हे विद्यार्थी सायटोजेनेटिक्स, मानवी अनुवांशिकता आणि पर्यावरणीय उत्परिवर्तन या क्षेत्रात पीएच.डी. करत होते.[३]

अर्चना शर्मा यांच्या संशोधनामुळे वनस्पतिशास्त्रातील महत्त्वाची प्रगती झाली. त्यांच्या उल्लेखनीय निष्कर्षांमध्ये वनस्पतिजन्य पुनरुत्पादक वनस्पतींमधील स्पेसिफिकेशन, प्रौढ केंद्रकात पेशी विभाजन, वनस्पतींमध्ये विभक्त ऊतकांमध्ये पॉलीटेनीचे कारण, फुलांच्या वनस्पतींचे साइटोटॅक्सोनॉमी आणि पाण्यात आर्सेनिकचा प्रभाव हे विषय येतात. फुलांच्या वनस्पतींवरील गुणसूत्र अभ्यासावरील त्यांचे संशोधन आणि निष्कर्ष यामुळे त्यांच्या वर्गीकरणाबद्दल नवीन माहिती मिळाली.[३] अर्चना शर्मा यांनी मानवी अनुवांशिकतेमध्ये देखील विशेष काम केले, विशेषतः सामान्य मानवी लोकसंख्येतील अनुवांशिक बहुरूपता या विषयावर.[३]

अर्चना शर्मा विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन परिषद, पर्यावरण विभाग, विदेशी वैज्ञानिक सल्लागार समिती यासारख्या संस्थांचे सदस्य होते. अर्चना शर्मा यांनी जैवतंत्रज्ञान विभागाच्या एकात्मिक मनुष्यबळ विकासावरील टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.[३]

अर्चना शर्मा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन परिषदेसह प्रमुख धोरण-निर्माण करणाऱ्या संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी होत्या. पर्यावरण आणि वन मंत्रालयाची पर्यावरण संशोधन परिषद, भारत सरकार; युनेस्को, मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार सह सहकार्यासाठी पॅनेल; आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध तांत्रिक समित्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग येथेही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.[४]

प्रकाशने

त्यांच्या कारकिर्दीत अर्चना शर्मा यांनी १० पुस्तके आणि ३०० ते ४०० शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांनी १९६५ मध्ये त्यांचे पती, सहकारी प्राध्यापक अरुण कुमार शर्मा यांच्यासोबत क्रोमोसोम टेक्निक - थिअरी अँड प्रॅक्टिस हे पुस्तक प्रकाशित केले.[३] त्या न्यूक्लियस या संस्थेच्या संस्थापक होत्या. सायटोलॉजी आणि संबंधित विषयांचे आंतरराष्ट्रीय जर्नल यांच्या संपादक पदावर त्या २००७ पर्यंत राहिल्या.[५] त्यांनी इंडियन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजी, प्रोसीडिंग्स ऑफ द इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या संपादकीय मंडळावर काम केले.[६]

अर्चना शर्मा यांनी सीआरसी प्रेस, ऑक्सफोर्ड, आयबीएच, क्लुवर अकॅडमिक (नेदरलँड्स) आणि गॉर्डन आणि बीच यूके सारख्या प्रकाशकांसाठी अनेक वैज्ञानिक खंडांचे संपादन केले.

वैयक्तिक जीवन

अर्चना शर्मा यांचा विवाह अरुण कुमार शर्मा यांच्याशी झाला होता.[७] अरुण कुमार यांना भारतीय सायटोलॉजीचे जनक मानले जाते.[८][९]

१४ जानेवारी २००८ रोजी अर्चना शर्मा यांचा मृत्यू झाला.[४]

पुरस्कार

  • जी.पी. चॅटर्जी पुरस्कार, १९९५
  • एस.जी. सिन्हा पुरस्कार, १९९५
  • पद्मभूषण (भारताच्या राष्ट्रपतींचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार), १९८४ [१०]
  • बिरबल साहनी पदक, १९८४
  • फिक्की पुरस्कार, १९८३
  • भारतीय विज्ञान अकादमी, १९७७ मध्ये फेलोशिप [११]
  • शांती स्वरूप भटनागर पारितोषिक, १९७५ [१२]
  • जे.सी. बोस पुरस्कार, १९७२

हे देखील पहा

  • विज्ञानातील महिलांची टाइमलाइन

संदर्भ

साचा:संदर्भयादी