अश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख अश्विनीकुमार हे देवदेवतांचे नव्हेत, तर ऋषींचेही वैद्य होते. ह्यांनी वृद्ध च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून दिले. अश्विनीकुमार अश्विनीकुमार ही जुळी भावंडे. एकाचे नाव नासत्य व दुसऱ्याचे दस्र होय. त्यांच्या आईचे नाव संज्ञा आणि वडिलांचे विवस्वान.

समुद्रमंथनामधून वर आलेले धन्वंतरी हेही देवांचे वैद्य होत.

अश्विनीकुमार हे वैवस्वत मन्वंतरात देव समजले गेले आहेत.

अश्विनीकुमारांना आवाहन करून पंडूच्या माद्री नावाच्या पत्‍नीने नकुल-सहदेव या जुळ्या पांडवांना जन्म दिला. .

ऋग्वेदांतील जवळजवळ ५० सूत्रांमध्ये अश्विनीकुमारांचा उल्लेख आला आहे. अथर्ववेदातही हे प्रेमी युगुलांचा मिलाप घडवून आणतात असे म्हटले आहे. (अथर्व-२.३०.२)