अहमदाबाद रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अहमदाबाद जंक्शन (गुजराती: અમદાવાદ રેલ્વે સ્ટેશન) हे अहमदाबाद शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. गुजरातमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले अहमदाबाद स्थानक कच्छ, सौराष्ट्र इत्यादी भूभागांना भारताच्या इतर भागांसोबत जोडते.

अहमदाबादहून मुंबईकडे रोज १४ प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. गुजरात एक्सप्रेस, कर्णावती एक्सप्रेस, सौराष्ट्र एक्सप्रेस, कच्छ एक्सप्रेस, सूर्यनगरी एक्सप्रेस, सयाजीनगरी एक्सप्रेस इत्यादी अनेक प्रसिद्ध गाड्या अहमदाबादला मुंबईसोबत जोडतात. पुण्यासाठी अहमदाबादवरून अहिंसा एक्सप्रेसदुरंतो एक्सप्रेस सुटतात.

दिल्लीकडे प्रवासासाठी अहमदाबादहून स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस, गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी जलद गाड्या उपलब्ध आहेत.