अहिंसेचा पुतळा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धार्मिक वास्तू

मांगी तुंगी हिल

अहिंसेचा पुतळा महाराष्ट्रातील नाशिक राज्यातील मांगी-तुंगी येथे आहे. हा जगातील सर्वात उंच जैन पुतळा आहे. प्रथम जैन तीर्थंकर वृषभनाथ यांचा हा पुतळा आहे.[१] हा पुतळा १०८ फूट (३२.९ मीटर) उंच आहे, तर पायथ्यासह याची उंची १२१ फूट (३६.६ मीटर) आहे.[२] जैन लोकांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या मांगी-तुंगी टेकड्यांमधून हा पुतळा बनवला गेला आहे. हा पुतळा सर्वात उंच जैन प्रतिक म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. ६ मार्च २०१६ रोजी गणिनी ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी आणि स्वामी रवींद्रकिर्तीजी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले.[३]

चित्रदालन

संदर्भ

साचा:संदर्भयादी