आओ नागा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

आओ नागा ही नागा प्रदेशातील मोकॉकचुंग जिल्ह्यातील आओ भाषा बोलणारी जमात आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या, ५५,८६६ होती. बहुतेक सर्वांनी अलीकडे ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. ‘चोग्‍लीचिग्टी’ नावाच्या खेड्यातील एका चॅक दगडापासून त्यांची उत्पत्ती झाली, असा समज आहे. आओ जमात मॉंगसेन व चोंग्‍ली अशा दोन उपजमातींत विभागली गेली आहे. भाषा, अन्न, वस्त्र व राजकीय संघटना यांबाबत दोन्ही उपजमातींत काही भेद आहेत. मनुष्यवध करून त्याचे मुंडके मिळविण्याची पूर्वीची पद्धत आता नष्ट झाली आहे. तरुणांची पारंपरिक युवागृहे (मोरुंग) पद्धतही चर्चच्या प्रभावाने आता नष्ट होत आहे. बीज-कुटुंबपद्धती रूढ आहे. मुख्य अन्न भात असून ते स्थलांतरित व सोपान-पद्धतीची शेती करतात. आओंच्या मृतास स्वतःच्या घरासमोरच जाळतात आणि नंतर त्याच्या अस्थी, दागिने, भांडी, आयुधे वगैरेंचा लाकडी प्रतिकृतींसह एक छोटा चौथरा बांधून त्याखाली पुरतात.

संदर्भ

  • मराठी विश्वकोश