आकाराम दादा पवार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र

आकाराम दादा पवार यांचा जन्म ४ एप्रिल १९२३ रोजी घरंदाज पवार कुटुंबात कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीत, वाढत गेले आणि वाढता वाढता शाळेचे वय झाले. अन् ६ वी पर्यंतचे शिक्षण कुंडल येथे झाले. पण पुढे दादांचे शिक्षण हे नकळत थांबलेच. शिक्षण थांबले पण दादांच्या पुढे प्रामुख्याने आई-वडिलांचा आदर्श होता.

दादांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच दिड एकर जमीन,एक भाऊ व तीन बहिणी, आई-वडिल, अशी सात माणसे. घरी खाणारे सात तोंडे. त्यात दोन बहिणींचे मालक दुर्दैवाने स्वर्गवासी झाल्यामुळे त्यांची ही जबाबदारी दादांच्यावर पडली. वयाच्या १३ व्या वर्षीच घरची सर्व जवाबदारी दादांच्यावर येऊन ठेपली. अन् १९३६ साली ऊसाच्या रसाचा घाणा टाकून रस विक्रीचे दुकान चालू केले अन् त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू केला. त्यानंतर अनेक प्रयत्नातून किर्लोस्करवाडीत १९३९ साली नोकरीस लागले.[१]

स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित

 त्याच साली जर्मनीचे हिटलर यांनी जागतिक युद्ध सुरू केले. अन् गांधीजींना हाच काळ चळवळ सुरू करण्यास योग्य आहे असे वाटले. गांधीजींनी ९ ऑगस्ट १९४२ मुंबई येथे काँग्रेसच्या अधिवेशनात गोवालिया टँक मैदानावर ब्रिटिशांना ‘चलेजाव’ व जनतेला ‘करेंगे या मरेंगे’ ही घोषणा दिली. त्यामुळे ब्रिटिशांनी अधिवेशनातील नेत्यांना धरपकड सुरू केले. अन् नेत्यांना येरवडा व इतर जेलमध्ये ठेवण्यात आले. गांधीजींच्या आदेशा प्रमाणे देशातील सर्व पक्षांच्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्या खाली एकत्र येऊन संघर्ष करण्याचा, लढा करण्याचा चळवळ उभा करण्याचा निर्णय घेतला.

१९४२ साली गांधीजींच्या आदेशा प्रमाणे दादांनी भूमिगत राहून लढण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील क्रांतिकारकांना एकत्र करून प्रथम ज्या बंगल्यात राहून ब्रिटिश सत्ताधिश कामकाज करत होते ते बंगले जाळणे, रेल्वे पाडणे, टेलिफोन तारा तोडणे, पाटलांचे राजीनामे घेणे आणि भूमिगत राहून कार्य करण्यासाठी हत्यारे मिळविण्यासाठी बँका लुटणे, एकूण ब्रिटिश सरकारला अस हकार करण्याचा निर्णय घेतला गेला आणि सर्व घडविण्यासाठी राष्ट्रसेवादलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णया प्रमाणे अच्युतराव पटवर्धन यांचे कडे काही नेते चर्चे साठी गेले.

गोव्यातून शस्त्रास्त्रे आणण्याचे कार्य

१९४२ साली दादागोविंद जोशी (बाळ) अशी दोघांणवर गोव्याहून हत्यारे आणण्याची जबाबदारी सोपविली. त्याप्रमाणे दोघे हत्यारे घेऊन गोव्याहून आले. गोव्याच्या मोहिमेत तीन आठवड्याचा कालावधी गेला. तिकडे तिथे बांद्याला थांबावयाचे तिथून खाडीतून पलिकडे जायचे व तिथून जमेल त्या प्रयत्नातुन हत्यारे खरेदी केली. अशा तऱ्हेने पोर्तुगीज पोलिसांची नजर चुकवुन १९ हत्यारे व त्याला लागणाऱ्या बुलेट्स एकत्र केल्या व हे सर्व घेऊन परत येत असता दाजीपूर येथे वेगवेगळ्या मार्गांनी जाऊन एका खाजगी गाडीत चढले. गाडीत बसून गाडी हलणार इतक्यात पोलीस गाडीत चढले आणि पोलिसांनी गाडी चेक करण्यास सुरुवात केली. परंतु दादा व गोविंद जोशी यांच्या सुदैवाने पोलिसांची नजर यांच्या पिशव्यांकडे गेली नाही तिथून गाडी हलताच हायसे वाटले व कसेतरी कोल्हापूरला आले. तिथे डी. बी. पाटील यांच्याकडे उतरले.सकाळी कोल्हापूरहून कुंडलला येण्यासाठी निघाले. किर्लोस्करवाडीत आले, तिथून कुंडलला चालत निघाले. कुंडल-ताकारी चौकात आले, तिथून शेतजवळच असल्यामुळे आणि लोकांच्या नजरा चुकविण्याच्या भूमिकेतुन पांढरी कडून (दादांची जमीन) जायला निघाले तोपर्यंत वाटेत शेतामध्ये दादांचे आई-वडिल होते त्यांची नजर दादा व गोविंद जोशिनवर पडली. बरेच दिवस गावी नसल्यामुळे ते अतिशय काळजीत होते. ते त्यांना पाहता क्षणीच पळत त्यांचा दिशेने आले अन् डोळ्यात पाणी आणून मिठीमारली आणि म्हणाले 'बाबांनो! कुठेही जा, पण आम्हाला सांगून जात जा!’ या प्रमाणे त्यांचा निरोप घेऊन ओढ्या ओढ्याने घरी पोहचले. घरातील माणसांना दादांना पाहताच आनंद झाला.[१]

दादांच्या घरी त्यांची थोरली बहिण हौसाक्का होत्या. दादा व गोविंद जोशी घरी जेवले. लगेच जोशी म्हणाले “आकाराम आपण आणलेल्या बुलेटस् (गोळ्या) सरदळलेल्या आहेत. आपण जर त्या वाळूमध्ये शेकल्या तर आपल्या कामास उपयोगी पडतील” हा विचार योग्य वाटल्यामुळे त्यांनी ओढ्यातून वाळू आणली व गोळ्या शेकण्यास सुरुवात केली. काही गोळ्या शेकत असता वाळू तवा तापल्या सारखी तापली होती. त्याचा परिणाम म्हणून गोळ्यांचा एकदम स्फोट झाला. वेळ दुपारची असल्या मुळे घरात माणसे कमी होती, तरीपण थोडी बहुत शेजारची माणसे घरी पळत आली. त्यांची दादांनी कशीतरी समजूत काढून कुठेही काही बोलू नका अशी सक्त ताकीद देऊन वेळ निभावली. चळवळीचा काळ असल्यामुळे लोकानीही जाणून घेतले. नंतर तांबट काका यांचे कडे साहित्य दिल्यानंतर दादांचा जीव भांड्यातपडला. अशी ही दादांची पहिली यशस्वी मोहीम पार पडली अन् त्यांना अधिक उर्मी आली आणि संसाराचा विचार न करता स्वातंत्र्याच्या रण कुंडात झोकून घेतले.

तासगांवचा मोर्चा युनियनजॅक खाली उतरवला

गोव्याच्या पहिल्या यशस्वी मोहिमेनंतर दादा व त्यांच्या साथीदारांच्या नजरा आता अन्य मोहिमा राबवण्यात गुंतल्या. अन् ‘तासगांव मोर्चा’ काढण्याचा निर्णय झाला. माळवाडीच्या शेतामध्ये जमलेल्या भूमिगत नेते व इतर कार्यकर्त्यानी तासगाव कचेरीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दादा, रामभाऊ लाड, ईश्वर बापू लाड वगैरे १०-१२ कार्यकर्त्यांनी बलवडी, आंधळी, आळसंद, वाझर, तांदळवाडी, किर्लोस्करवाडी अशा गावामध्ये सभा घेऊन प्रचार केला व ३ सप्टेंबर १९४२ रोजी किर्लोस्करवाडी येथे एकत्र जमले. त्याठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड, गोविंदराव खोत, आदम पैलवान वगैरे नेत्यांचे नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. क्रांतिसिंह नाना पाटलांवर शासनाचा डोळा आहे, तेव्हा चळवळ चालू ठेवायची असेल तर नाना पाटलांना मोर्चातून वगळावे असा निर्णय घेतला. नाना पाटलांच्या विना मोर्चा चालू लागलाया प्रमाणे परिसरातील दहा एक हजार लोक मोर्चाने तासगांव कचेरी जवळ जमले. त्यानंतर नेत्यांनी मे.निकम मामलेदार यांना बाहेर बोलवून त्यांना गांधी टोपी घातली व ब्रिटिशांचा युनियन जॅक कचेरी वरून खाली ओढला व त्याच ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवला. तेथून घोषणा देत ते परत फिरले वाटेत निमणी बंगल्यामध्ये गेले. ब्रिटिशांचे हस्तक याठिकाणी थांबून या भागातील चळवळ उध्वस्त करीत असत म्हणून तो बंगला जाळला व तिथून आप आपल्या गावी परतले. दुसरे दिवशी ते किर्लोस्करवाडीचे कामगार कामावर गेले.त्या नंतर पुढील कामाची दिशा त्यांच्या नेत्यांनी ठरवली. त्या प्रमाणे वांगीचा, शेणोलीचा, पानमळ्याचा बंगला जाळला असे आपापल्या भागातील शक्यते बंगले जाळले, नंतर जिल्ह्यातील टेलिफोन तारा तोडण्याचा निर्णय घेतला. त्या टेलिफोन तारा एकाच वेळी तोडल्या यासाठी जिल्ह्या भरातील कार्यकर्ते एकत्र करून टेलिफोन तारा तोडल्या.

इस्लामपूर मोर्चा

त्या नंतर पुढे काय याचा विचार करण्यासाठी क्रांति सिंह नाना पाटलांचे नेतृत्वाखाली क्रांतिवीर दे. भ. अप्पासाहेब लाड, जी. डी. (बापू) लाड यांचे शेतात दादा, भूमिगत व इतर कार्यकर्ते एकत्र जमले व त्यामध्ये इस्लामपूर मोर्च्याची तयारी केली. तासगावचा मोर्चा यशस्वी झाल्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इस्लामपूर मोर्चा यशस्वी होऊद्यायचा नाही म्हणून फारमोठा फौजफाटा एकत्र केला. चळवळीतील सर्व कार्यकर्ते आणि किर्लोस्करवाडीचे कामगार मोठ्या संख्येने मोर्चा साठी गेले. परंतु मोर्चाचे बंड मोडून काढणेचे दृष्टीने पोलिसांनी मोर्च्यावर गोळीबार केला. त्यामध्ये पंड्या इंजिनिअर, सखाराम बारपट्टे हुतात्मा झाले. कार्यकर्ते धारातिर्थी पडलेले पाहून बरेच लोक परत फिरले व दुसरे दिवशी लोकांना अटक करण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले.

याच प्रमाणे वडूजच्या कार्यकर्त्यांनी वडूजच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा काढला त्यामध्ये परशूराम घाडगे वगैरे सात कार्यकर्ते हुतात्मा झाले. त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन आपण काही निश्चित निर्णय घेण्याचा विचार करून ३ ऑगस्ट रोजी पणुंब्रे येथे दादा व त्यांचे साथीदार एकत्र आले व त्यामध्ये संघटनात्मक बांधणी केल्याशिवाय जर काही प्रयत्न केले नाही तर नाहक आपले कार्यकर्ते पकडले जातील. चळवळ संपेल आपली सर्वांचीच वाताहत होईल, म्हणून त्यासाठी मे मध्ये औंध येथे जे शिबीर घेतले आहे त्याशिबीरासाठी आपापल्या भागातील कार्यकर्ते पाठवूया असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कुंडल भागातून या शिबीरासाठी आकाराम दादा पवार व रामभाऊ लाड अशा दोघांना पाठवून दिले ते शिबीर दीड महिन्याचे होते. त्या शिबीरासाठी गेल्यामुळे दादांना व त्यांचा साथीदारांना किर्लोस्करवाडीच्या कामाला मुकावे लागले.

व्यायामशाळा ते तुफानसेना

औंध येथील दीड महिन्याचा कोर्स पुरा झाल्या नंतर दादांनी खेड्यापाड्यातील तरूण कार्यकर्ते एकत्र करून प्रत्येक महिन्याला १०० स्वयंसेवकांना एक महिन्याचे ट्रेनिंग देऊन १००० कार्यकर्ते तयार केले. त्यांनी आप आपल्या गावी शेतकरी, मुले, महिला यांची सेवादले सुरू करून त्यांना लाठी, भाला, जांबिया यांचे तसेच कवायत यामध्ये ट्रेण्ड केले. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत सर्व ठिकाणी लोक एकत्र येऊ लागले. माग आकाराम दादा  आणि कॅप्टन रामभाऊ लाड असे दोघे काही वेळ व्यायाम शाळेत व बाहेर गावीही असे काम करू लागले. त्या प्रमाणे आकाराम दादा अंकलखोप, येळावी, दुशेरे, शिरवडे (ता. कराड), सदाशिवगड, हणमंतवाडी, इंदोली, रेठरे, अप्पाचीवाडी (ता. चिकोडी) अशा ठिकाणी मुलांची शिबीरे घेत होते. कॅप्टन रामभाऊ लाड व्यायाम शाळेत काम बघू लागले[२].

 अशा तऱ्हेने शिबीरे घेतल्यानंतर त्या शिबीरातून कार्यकर्ते तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या भागांत ८ ते १० गावाचा ग्रुप तयार करून त्यातील निवडक लोकांची परीक्षा घेऊन त्यातून तुफान सेनेची निवड केली. त्यामध्ये तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी.बापू लाड होते आणि तुफान सेनेचे क्रांतीवीर कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते[३].याप्रमाणे अंदाजे ५००० तुफान सैनिक तयार झाले आणि या तुफानसेनेच्या ताकदीवर गावोगावी न्यायदान मंडळे चालू केली. गावागावामध्ये सेवादले, न्यायदान मंडळे तयार केल्यामुळे योग्य न्याय मिळू लागला. हे सगळे घडल्यामुळे कोर्ट-कचेऱ्या बंद झाल्या. लोकांना विना खर्चाचा न्याय मिळू लागल्यामुळे गावातील टग्यांचा सुळसुळाट कमी झाला व त्यामुळे भूमिगताबद्दल जनतेत आदर निर्माण झाला. याचा परिणाम सर्व गावे भूमिगतांची आश्रय स्थाने बनली. अशी सर्व बांधणी झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात जो पोलिसांचा त्रास होता तो कमी झाला. लोक पोलिसांचा जर छापा पडणार असेल तर अगोदरच बातमी देऊ लागले. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी हैराण होऊन गेले. त्यांना कोणी भूमिगतांची गावात असले तरी माहिती देईनात. ही सगळी परिस्थिती बघून इंग्रज आपले पोलीस व अधिकाऱ्याबद्दल गैरविश्वास दाखवू लागले. त्यामुळे शेवटी त्यांनी आपले डी. एस्. पी. सारखे अधिकारी व इतर सी. आय. डी. सारखे लोक पाठवून प्रयत्न केला पण वेळगेली होती. दादांना आणि जी.डी.बापूं यांना पकडण्यासाठी सरकारने रोख बक्षीस जाहीर केले होये, पण ते शेवटपर्यंत सरकारच्या हाती लागू शकले नाहीत.

गिल्बर्टचा ‘कुंडल’ गावालावेढा

 कुंडल येथे भूमिगत कार्यकर्त्यांची मिटींग घेतली आहे ही बातमी पोलीस अधिकाऱ्यांना समजली. त्यावेळी नाना पाटील, खानदेशाचे उत्तमराव पाटील व त्यांचे ८ ते १० सहकारी व कुंडल भागातील भूमिगत कार्यकर्ते हे बैठकीसाठी एकत्र आलेले त्यांना कळाले. त्यांना ही खासच बातमी लागल्यामुळे त्यांचा एक युरोपियन अधिकारी गिल्बर्ट (डी.एस.पी.) याने कुंडल भोवती वेढा दिला. त्याचवेळी चेकींगसाठी कुंडल मध्ये जैन मंदिरात २५० पोलीस कायमचे ठेवले होते. त्या पोलिसांचे केस-दाढी करण्यासाठी गणपती गायकवाड जात असत. त्यालाच आपला विश्वासू म्हणून ते गृहीत धरत असत. गिल्बर्ट याने कुंडलचे चावडी मध्ये अतिसंशयित असणारी मंडळी एकत्र केली व ओळख्या म्हणून गणपती गायकवाड यांना बोलावले. त्या मध्ये काही भूमिगत असताना सुद्धा त्यांना सोडून देण्याचे काम गणपतराव गायकवाड यांनी केले. त्यावेळी आकाराम दादा व कृष्णाजी महादेव दौंडे यांचे माडीवर तुफानसेनेतील कार्यकर्त्यांच्या बरोबर होतो. छापा टाकण्या अगोदर गिल्बर्ट आकाराम दादा यांच्या घरी गेला. दादांचे चुलते खाशेराव पवार ( आबा) हे सोप्यात झोपले होते तो त्यांच्या जवळ गेला व हाताला धरून १०-१२ फुटावर फेकून दिले व म्हटले ''कुठाय आकाराम!'' पण त्यांनी काही सांगितले नाही. मग दौंडे यांच्या माडीवर गिल्बर्ट आला. तेथे चार खोल्या होत्या. त्यात ४x६ची एक खोली होती, त्या बंद खोलीत आकाराम दादा होते. पोलीस मुलांना उठवू लागले. त्यावेळी बाळ जोशी म्हणाले," मुले दिवसभर दमली आहेत. तेव्हा तुम्हाला काय पाहिजेते मला विचारा" हे म्हटल्यावर त्या अधिकाऱ्याने मुलांना उठवले नाही.

अशा तऱ्हेने गिल्बर्टने दोन्ही जिल्ह्यातील मुख्य ठिकाणे धुंडाळली. पण दोन्ही जिल्ह्यातील एकही भूमिगत त्यांना मिळूशकला नाही. त्यामुळे परत अधिक पोलीस फोर्स वाढवून लोकांना पकडण्याचे सत्र चालू केले त्यामुळे जिल्ह्यातील शिबीरे बंद करावी लागली.गिल्बर्ट या इंग्रजी अधिकाऱ्याने सातारा प्रतिसरकार मधील सर्व भुमिगतांना पकडण्याचा विडाच उचलला होता आणि १९४४ च्या दरम्यान त्याने आक्रमक भुमिका घेतली होती आणि त्याच दरम्यान राजापुर, लिंब, मोराळे कोथवडे, अपशिंगे येथील रामोशी फारमोठा त्रास शेतकऱ्यांना देत होते. दहा पंधरा खेड्यातील शेतकऱ्यांच्या कडून खंडणी वसूल करीत होते. तसेच कऱ्हाड मध्ये त्यांनी लाकडाची वखार सुरू केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांची झाडे तोडून नेत होती. वर्षाला ५० पासून ५०० रूपयांपर्यंत पैसे वसूल करत होते. दागिने हिसकावून नेत होते. तेव्हा या रामोशी लोकांचा बंदोबस्त करण्याचे ठरले. त्या प्रमाणे आकाराम दादा  दुशेरे, शेरे, शेणोली, वडगांव, गोंदीया भागातील कार्य कर्त्यांना सूचना देऊन रात्री दहा वाजता अपसिंग कोतावड्याचे रामोशाचे घरा समोर दिड ते दोन हजार लोक बसवले. काही घाटा खालून, काही खानापूर तालुक्यातुन एकत्र केले व त्या रामोशास माफी मागायला लावून ज्याच्यावर अन्याय केला त्या सर्व लोकांचे पैसे द्यायला लावले त्यामुळे गुन्हेगारांच्यावर चांगलाच वचक बसला आणि पोलीस खाते सुद्धा प्रतिसरकारला घाबरू लागले. त्यामुळे न्यायदानाचे काम चांगले तऱ्हेने होवू लागले, व लोक प्रतिसरकारवर प्रेम करू लागले.[१]

क्रांतिकारी लग्नसोहळा

 नंतर काहीदिवसांनी क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचा लग्नाचा बेतठरला पण ते भुमिगत असल्यामुळे शाहीर निकमयांचे लग्न असल्याचे गाजावाजा करण्यात आला व कुंडल येथील सुर्योपासना मंदिराच्या जवळील स्टेजवर लग्नसोहळा आयोजित करण्यात आला. त्या लग्नासाठी ८ ते १० हजार कार्यकर्ते जमा झाले. रायफलीच्या आवाजात जी. डी बापू  लाडविजयाताई यांचा विवाह रक्ताचा टिळा लावून संपन्न झाला. लाडवाच्या जेवणाच्या कार्यक्रम उरकून सैनिक अवघ्या तासाभरात आपआपल्या गावी गेले. त्यावेळी कुंडल येथील जैन मंदिरात २५० पोलीस असताना कुणीही प्रतिकार केला नाही. पोलीस खाते घाबरून गेले होते. हा लग्नसोहळा, रामोशाचे बंड मोडून काढले या सर्व प्रकारामुळे ब्रिटिश शासनाने सर्व ठिकाणची सेवादले बंद केली आणि त्यामुळे सेवादलाचे पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नावे बदलून खानदेशात पाठवावे लागले.

खानदेशातील चळवळ

त्यानंतर आकाराम दादा व त्यांच्या साथीदारांनी ,पूर्णवेळ देणाऱ्या कार्य कर्त्यांना नावे बदलून खानदेशामध्ये पाठवले. त्यामध्ये आकाराम दादा 'अरविंद' या टोपणनावाने, शंकराव जाधव 'हरी', नारायण संकपाळ 'गिल्बर्ट', गोविंद जोशी 'बाळ', रघुनाथ रावळ ‘गुणड्या भाऊ’ वाई जवळच्या भागात कॅप्टन रामभाऊ लाड, शामराव लाड (बाळू),शामराव मांजर्डेकर, ईश्वर बळवंत लाड, महादेव लोहार- दूशेरे, सदाशिव पवार पारे, भगवानराव सुर्यवंशी, बब्रुवाहन जाधव त्याप्रमाणे आकाराम दादा (अरविंद) ,नारायण संकपाळ (गिल्बर्ट) व   शंकर जाधव (हरी) असे तिघे जन खानदेशात थांबले. नंतर नारायण संकपाळ व शंकर जाधव अमर नेळ येथे थांबले व आकाराम दादा धुळे जिल्ह्यात श्रावण बोधवड येथे भगा पाटील यांच्या कडे थांबले. नंतर ८ ते १० दिवसांनी चाळीस गाव तालुक्यातील पातोंडे येथे १०० मुलांचे राष्ट्रसेवा दलाचे शिबीर घेतले.नंतर दादा त्या विभागामध्ये खेडोपाडी काम करू लागले. त्याच काळा मध्ये कुंडल गावच्या भूमिगत कार्यकर्त्यांनी हजर राव्हावे व न राहिल्यास कुंडल गावावर सत्तर हजार रूपये सामुदायिक दंड बसविला जाईल असा ब्रिटिशाचा आदेश आला त्याप्रमाणे नाथाजीराव लाड यांनी आकाराम दादांना  निरोप पाठविला. त्या प्रमाणे आकाराम दादा नाथाजींना मुंबई येथे भेटण्यास गेले. तेथे गेल्यावर नाथाजी उर्फ सुरेश बाबु यांनी आकाराम दादा यांना ताबडतोब औंधला जाऊन हजर व्हा असे सांगितले. कारण ब्रिटिशांना भूमिगत कार्यकर्ते सापडत नाहीत म्हणून कुंडल गावावर सत्तर हजार रूपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला असल्याचे सांगितले. त्या प्रमाणे आकाराम दादा  १९४४ साली औंधला हजर झाले. त्यावेळी देशभक्त आप्पासाहेब लाड, बाबुराव पाटील हे ही जेल मध्ये होते. दादांच्या अगोदर त्या ठिकाणी कुंडलचे १० ते १२ जण अटक होते. त्यांना पॅरेलवर सोडले होते.

औंध जेलमध्ये असताना औंध संस्थानाच्या राजांचे चिरंजीव बॅ.आप्पासाहेब पंत हे काँग्रेसचे नेते असल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने औंधच्या आसपासच्या खेड्यात जाऊन कार्य करायचे व संध्याकाळी जेलमध्ये हजर रहायचे, असे दादा व त्यांच्या साथीदारानसुरू केले. हे सर्व संस्थानचे राजे असल्यामुळे त्यांचेच सल्ल्याने घडत असल्यामुळे हे करू शकले. त्यानंतर १९४५ साली पॅरेलवर सुटले. १९४६ साली सिमला परिषदेच्या वाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळी जेल मधुन सर्व राजकीय कैदी सोडले. लॉर्ड माऊंट बॅटनच्या नेतृत्वाखाली सिमला परिषद सुरू झाली. त्यासाठी बॅ. महंमद जीना, महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल वगैरे नेत्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या.

भाग्यपर्व

अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची बाजी लावली. असे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी तसेच जालियन बागेत ज्यांच्या रक्ताचे पाट वाहिले, बाबुगेनू सारखा परदेशी मोटारीच्या आडवे पडून त्यांच्या अंगावरून गाडी गेली व गोऱ्या साहेबाच्या गाडीखाली चिरडून मेले. त्याच्या भावनेची कदर न करता ज्यांनी देशासाठी काही त्याग न करता पैशाची खैरात करून मंत्रि मंडळात आरूढ झाले. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून घरादारावर ज्यांनी तुळशी पत्र ठेवले. त्यांची दखल सुद्धा न घेता स्वतः मंत्रिमंडळात आरूढ झाले व जे देशासाठी भूमिगत राहून लढले त्यांना त्यांच्याकडे असणारी हत्यारे घेऊन त्वरीत हजर रहा अन्यथा तुमच्यावर वॉरंट काढले जाईल व आपण शिक्षेस पात्र व्हाल असा फतवा मोरारजीभाई सरकारने काढला. सत्ताधारी पक्षाबद्दल सर्वांच्या मध्ये नाराजी आली व आपण आपल्या विचाराचा पक्ष काढून सर्व सामान्यांच्या न्यायासाठी वेगळा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली व त्याचे पहिले अधिवेशन सोलापूर मध्ये झाले. त्यामध्ये तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापु लाड, महादेवराव गायकवाड असे अनेक शेतकरी नेते हजर राहिले व शेतकरी कामगार पक्षाची घटना कार्यक्रम या मुलभूत भुमिकेवर विचार करून शेतकऱ्यांच्या चळवळीचा कार्यक्रम ठरवून पक्षाची स्थापना केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील समग्र शेतकरी उभा राहिला. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व सामान्य कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले.त्याच कालावधी मध्ये देशाची घटना तयार करण्यासाठी मोठ्या तंज्ञांची समिती निर्माण केली. पण त्यामध्ये ७० ते ८० टक्के शेतकरी वर्ग आहे त्यांना योग्य न्याय न दिल्यामुळे श्रमिक शेतकरी वर्ग नाराज झाला.

खानदेशातील क्रांतिसिहांचा दौरा

क्रांतिवीर नाथाजी लाड यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा राज्यव्यापी दौरा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तुफानसेनेला पुन्हा एक वेळ एकत्र करून त्यांची शिबीरे घेऊन त्यांचे ड्रेस तयार करणे. कार्य कर्त्यांची मोजदाद सुरू केली. आकाराम दादा पॅरेलवर असल्यामुळे दादांना चिकोडी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथे शिबीर घेण्याची जबाबदारी दादांवर टाकली त्याप्रमाणे आप्पाचीवाडी व आसपासचे (कर्नर, वंदूर, हंचनाळ, सौदलगा, बुद्धीहाळ, निपाणी) या भागातील काही कार्यकर्ते असे १५० लोकांचे शिबीर घेतले व कोल्हापूरला तुफान सैनिकांच्या फौजे सह नाना पाटलांचा दौरा सुरू केला त्यानंतर खानदेश मधील नेते उत्तमराव पाटील यांचे सल्ल्याने त्या भागातील काही तुफान सैनिक व सातारा जिल्ह्यातील ५०० असे जवळ जवळ १००० सैनिकांचा दौरा शिंदखेडचे विष्णूपंत पाटील, बाबुराव गुरव, महादेव पाटील, शंकर शिंपी, बाबुळ गावचे देशपांडे वगैरे खानदेश मधील भूमिगत कार्यकर्त्यांच्या समवेत क्रांतिसिंह नाना पाटील, उत्तमराव पाटील यांनी तुफान सैनिकांच्या समवेत अविस्मरणीय असा दौरा केला. तो दौरा पाहून खानदेशातील जनतेने गुलालाची उधळण, हारांची खैरात, फळांच्या दोन तीन गाड्या तसेच पैशाच्या थैल्याही देऊन यथोचित सत्कार केला. तो पैसा देशभक्त उत्तमराव पाटील यांनी खानदेशातील संघटने साठी ठेवून घेतला. सातारच्या तुफान सैनिकांचा यथोचित सत्कार केला व नंतर आपआपल्या जिल्ह्यात स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यासाठी परत आले.

मराठवाड्यातील चळवळ

७०० संस्थानिकांचा प्रश्न तसाच राहिला होता. म्हणून निवडून आलेल्या मंत्री मंडळाने तो प्रश्न धसास लावला. सर्व संस्थानिकांना मानधन देऊन त्यांच्या खाजगी प्रॉपर्टी त्यांना देऊन संस्थान विलीन करण्याचा आदेश दिला. त्या प्रमाणे विलीनी करण औंधचे राजे बाळासाहेब पंत प्रतिनिधीयांनी केले. अशा तऱ्हेने सर्व संस्थानिकांनी आपली संस्थाने विलीन केली. परंतु निजामाने आपले संस्थान विलीन न करता संस्थानातील जनतेला आपल्याशी एकनिष्ठ राहण्याचा आदेश दिला परंतु तेथील मराठवाड्यातील क्रांतिकारी नेत्यांनी मोठ मोठ्या सभा घेऊन निजाम विरोधी निदर्शने करण्यास जनतेला प्रोत्साहन दिले. हे पाहिल्या नंतर निजामाने ही चळवळ मोडून काढण्यासाठी जनतेवर अन्याय अत्याचार सुरू केला. मराठवाड्यातील क्रांतिकारक नेते क्रांतिसिंह नाना पाटील, केशवरावजेधे, शंकरराव मोरे, काकासो वाघ तसेच केदार गुरुजी, डॉ. पंजाबराव देशमुखयांना भेटले व मराठवाड्यातील लढा सुरू करण्यासाठी शासनास परवानगी मागण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल त्या वेळी काही निमित्ताने नागपूरला आले होते. आकाराम दादा व त्यांचे सहकारी वल्लभाई पटेल यांना भेटण्यास गेले त्या मध्ये कॅ. रामभाऊ लाड, कॅ.शामराव लाड असे ५०-६० लोक भेटण्यास गेले. परंतु वल्लभभाई पटेल यांनी आकाराम दादा व त्यांच्या सहकार्यांना प्रोत्साहन न देता ते म्हणाले, “सरकार त्यासाठी समर्थ आहे. वल्लभभाई पटेल यांना भेटण्यास गेलेले मंडळी परत फिरले व नाशिक येथे सर्व नेते एकत्र जमले. मराठवाड्यात लढण्यासाठी शिबीरे घेऊन त्यातून लढाव कार्यकर्ते तयार करून निजामाला वठणीवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मराठवाडयातून आण्णासाहेब गव्हाणे, नरसिंगराव देशमुख, हरी मास्तर चातारीकर, केरबा पाटील, गोदाजीराव, गोविंदराव महल्ले, किसनराव पाटील, बी. एन. देशमुख, नामदेव मोहोळ, मधुकर धनाजी पाटील, पंढरीनाथ पाटील, संतोषराव पाटील, नारायणराव पाटील, सखाराम वायफनकर, बाबुराव पाटील, नानासाहेब मोहोळ, रामदास पाटील वगैरे कार्यकर्ते एकत्र करून मराठवाडा चळवळीसाठी प्रचार केला. मराठवाड्याचे चळवळीचे लढ्यासाठी उमरखेड ता. पुसद, जि. यवतमाळ येथे पैनगंगेच्या तिरावर काशिगीर महाराजांचे उमरखेडच्या पुर्वेस फारमोठे मठ आहे. त्या मठामध्ये देवालयात १५० ते २०० मुले झोपतील असे मोठे ठिकाण आहे. त्याठिकाणी शिबीरास जागा मिळाली. पुर्वी या मठात आसपासचे भाविक येत, ते आपआपल्या भागातुन धान्य, , पैसे आणुन खंडीच्या पुऱ्याचा जेवणाचा कार्यक्रम करत मोठ्या कढईमध्ये पुऱ्या करत, असा प्रघात होता. त्याठिकाणी जागा मिळाली, मोठी विहिर आहे, तिथे आंघोळीची व जेवणाची व्यवस्था ही होती. बाहेर तिथेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. केरबा पाटील, हरी मास्तर (माने) यांनी धान्य ठेवण्याची व्यवस्था केली त्यांनी लागेल तसे धान्य दिले. त्या ठिकाणी खेड्यापाड्यातल्या लोकांनी धान्य, भाजीपाल्याच्या स्वरूपात वर्गणी आणून दिली. खेड्यापाड्यातील लोकांनी फार मोठी व्यवस्था केली. तसेच मराठवाडयातील लोकांनी त्याठिकाणी धान्य, पैसा देण्याची व्यवस्था केली. ॲड. विठ्ठल संभाजी चौधरी, उमर खेडरंगारी, गोधाजीराव मुखरे या शिवाय बऱ्याच लोकांनी धान्य, पैसे दिले. तेथील कार्यकर्त्यांनी त्या भागातील खेड्यांना दिवस ठरवून दिले. त्यामुळे दादा व त्यांच्या सहकार्यांना कसलीच अडचण पडली नाही.

 मराठवाड्यातील तरूण मुले त्याठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मराठवाड्यातील नरसिंगराव देशमुख, किसनराव देशमुख, उद्धवराव पाटील या नेत्यांनी केली. अशा तऱ्हेने जुळणी झाल्या मुळे प्रत्येक महिन्याला १००/१५० मुले शिबीरासाठी येवू लागली. त्यांना एक महिन्याचे ट्रेनिंग दिले की, ते आपल्या भागात जाऊन संघटित काम करत असे. असे सात महिने शिबीर चालू राहिले. त्यामुळे त्या ठिकाणी अतिहल्ले सुरू केले तसेच शासनानेही मिल्ट्री अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे निजाम वठणीवर आला व संस्थान विलीन केले. अकोल्याचे केदार गुरुजी, किसान ताकवले अशांनी ही वर्तमान पत्राद्वारे प्रचार केला. अमरावतीचे नाना सोमोहोळ, डॉ. पंजाबराव देशमुख, शंकरराव चौगुले,बापुसाहेब देशमुख, चंपालाल शिंदे अशा कितीतरी लोकांची नावे सांगता येतील. वीर उत्तमराव मोहिते, लोंढे गुरुजी, रामदास पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते अग्रभागी होते. अशा अनेक कार्यकर्त्यांची याच वेळी, साताऱ्याचे हरी मास्तर (माने) यांचा भाचा हा सातगाव तालुक्यातील आपल्या मामाकडे येत असता मुस्लिम काशिम रजवीचे शिपायांनी त्याला धानोरा येथे अडविले, "तु कोठे जातो आहेस?" असे त्याला विचारले त्याला बाभळीच्या झाडाला बांधुन खुपखुप मार दिला. नंतर त्याचे डोळे काढुन हाल हाल करून मारले. त्यानंतर संस्थान काँग्रेस मधील लोकांनी रविवारच्या भर बाजारात उमदी या ठिकाणी लाखाचा डाका टाकला. त्याच्या अगोदर वाशिम येथे त्यांच्या कॅम्पमध्ये आकाराम दादा यांना बोलवले व म्हणाले "आम्हाला शस्त्र देता का?" तेव्हा दादांनी  त्यांना सांगितले आमचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी बापू . लाड यांच्या आदेशा शिवाय आम्ही काही करू शकत नाही''. हे ऐकल्यानंतर त्यांनी त्यांचा नाद सोडला. त्यानंतर ‘’मराठवाड्यातील इरळी येथे ग्राम स्वराज्याची मुहूर्त मेढरोवणेची आहे तेव्हा तुम्ही व कॅप्टन रामभाऊ लाड दोघांनीही ताबडतोब निघा.’’ अशा नेत्यांच्या आदेशप्रमाणे आकाराम दादा व कॅप्टन रामभाऊ लाड बार्शी तालुक्यातील पिंपरी येथे हजरराहून तेथून इरळी येथे गेले. तिथे त्यांना आणि मराठवाड्यातील सर्व नेते हजर होते. तेथे फारमोठ्या जमावात कार्यक्रम झाला व त्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथे ज्या पांडूरंग बुरगुटे यांचे वाड्यात रझाकार राहिला होता. तिथुन त्याला हुसकुन लावण्यासाठी तुफान गोळीबार दोन्ही कडुनही चालु झाला. अंधारी रात्र असल्यामुळे परिणाम काय होतो हे कळले नाही. नंतर आकाराम दादा व कॅप्टन रामभाऊ परत फिरले.अशा तऱ्हेने मराठवाड्याचे कामकाज चालु असता १९४८ साली महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे याने खून केल्याची दुदैवी घटना कळली व देशभर या घटनेने शोककळा पसरली. नथुराम ब्राह्मण समाजाचा असल्या मुळे ज्याब्राह्मणांनी खून केला त्यांची घरे पेटवण्याची फारमोठी मोहिम सुरू झाली. त्यावेळी आकाराम दादा ती घटना पाहून त्यांचे बाबत वन्हाड मधील नेते काय निर्णय घेतात, याचा अंदाज घेण्यासाठी अमरावती येथे गेले व त्यानुसार निर्णय घेतला.

वऱ्हाडमधील शेतकऱ्यांचे संघटन

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आकाराम दादा व त्यांच्या साथीदारांना बोलावले व म्हणाले, "आपण आता अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे शिबीर घेवूया व त्यामधुन शेतकऱ्यांची संघटना बांधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया." असा निर्णय घेतल्यानंतर त्याठिकाणी १५० मुलांचे एक महिन्याचे शिबीर घेतले. त्याच प्रमाणे डिग्रज येथे बाबुराव पाटील (तेली समाजाचे मोठे नेते) यांचे सल्ल्याने एक शिबीर घेतले. शिबीराच्या समारोपाच्या वेळी क्रांतिसिंह नाना पाटील हजर होते. त्यांच्या स्वागतासाठी तेथे लोकांनी एक एकर ऐवढा प्रचंड मांडव घातला. त्या भागातील अंदाजे दोन लाख समुदाय आपल्या नेत्याला पहायला जमला त्या ठिकाणी हारांच्या ढिगा मधुन नाना पाटील दिसेनात एवढा मोठा ढिग जमला होता. त्यांनी हार, थैली, फळेयांची खैरात त्या ठिकाणी केली होती. हा कार्यक्रम व नंतर वऱ्हाडभर दौरा केला. ज्या भागात नाना पाटील जात त्या रस्त्यावर लोक थांबत, हार घालत, फळे व थैली देत असत. असा हा भुतोन भविष्यतेः दौरा पाहून बडेबडे शेतकरी, श्रीमंत व्यापारी यांच्या मध्ये चर्चा सुरू झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून प्रांताध्यक्ष ब्रिजलाल बियाणी यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सभेवर बंदी घातली. त्यावेळी बंदी उठे पर्यंत नाना पाटलांनी सभा घेतली नाही त्यावेळी या दौऱ्यामध्ये जेधे, शंकरराव मोरे, जी. डी बापू लाड, नाथाजी लाड, पंजाबराव देशमुख, केदार गुरुजी, शाहीर निकम, कॅप्टन रामभाऊ लाड, शामराव लाड असे दहा-पंधरा नेते होते. हा सर्व प्रकार पाहून प्रांताध्यक्ष ब्रिजलाल बियाणी यांना जाब विचारण्याची जबाबदारी आकाराम दादा यांच्या वर टाकली. त्याप्रमाणे आकाराम दादा  त्यांना भेटले आणि मग भाषणावरची बंदी उठवली गेली. आणि अशा तऱ्हेने क्रांतिसिंह नाना पाटील यांनी वऱ्हाडमधील दौरा पूर्ण केला व सर्व नेते मंडळी सातारला परतले. आकाराम दादा व रामभाऊ लाड, शामराव लाड हे तिघे डॉ. पंजाबराव देशमुख यांचे  आग्रहामुळे अमरावती कॉलेजवर थांबुन पाचही जिल्ह्यामध्ये शिबीरे घेऊन कार्यकर्त्यांची यंत्रणा उभी केली व नंतर काही काळ आकाराम दादा व कॅ. रामभाऊ लाड थांबले मग सर्वच ठिकाणी सामसुम झाले नंतर एके दिवशी अमरावतीच्या पूर्वेस छोटीसी टेकडी आहे, त्या टेकडीवर सायंकाळी ५ ते ६ वाजता चर्चा करत असता आकाराम दादांच्या डोक्यात एक विचार आला, आणि ते कॅ भाऊ यांना म्हणाले ‘’भाऊ आपण असे किती काळ थांबणार! कारण आपले सर्व कार्यकर्ते सातारला गेले आहेत. निजामचा लढाही संपला आहे. शिवाय आपल्या घरचा विचार केव्हा करायचा. "  हा विचार डोक्यात येताच, दोघांनाही गावाकडील आठवण येवू लागली.आकाराम दादा व कॅ. भाऊ यांच लग्नेही तेव्हा झाल नव्हत. बाकीचे सर्व आपआपला संसार पाहत होती. या दोघांच्या पुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. पुढे काय? त्यानंतर आकाराम दादा व कॅ. भाऊ कुंडल गावी परतले.

आकाराम दादा यांचा लग्नसोहळा

 दादांच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे लग्न होणे सुद्धा मुश्किल झाले होते. आकाराम दादा व कॅ. भाऊ यांची फक्त एकच जमेची बाजू अशी कि ही दोघे पाटलांची मुले असल्यामुळे आकाराम दादा यांना हरीबा रामा लाड यांची सुकन्या सुभद्राताई यांच्याशी विवाह ठरल व कॅ. रामभाऊ लाड यांना विठोबा हरी सावतयांची कन्या कल्पनाताई ह्या पत्नी लाभल्या. व त्याच वेळी आसपासचे महार, मांग, पाटील अशा गोरगरीबांचे २१ लग्नेबत्तीच्या प्रकाशात झाली. त्यावेळी ज्यांची त्यांची जोडपी एकत्र करणे सुद्धा मुश्किल झाले. २१ लग्ने असल्यामुळे जमाव मात्र खुप होता. कपडे मात्र ज्याची त्याची घालून आकाशी मांडवात हजर झाले व मोठ्या जयजयकारात लग्नसोहळा पार पडला व सर्वजण आपआपल्या घरी जेवण्यास गेले. लग्न झाले परंतु आर्थिक प्रश्न भेडसावू लागला. दादांना घरची दिडएकर जमीन त्यावर उदरनिर्वाह  होत नव्हता म्हणून दादांचे वडिल कुंडल गावातील विणकरांची ओझी बैलगाडीतून पलूस, ताकारी, शेणोली असे बाजार करीत असे. दादा भांड्यातून जेकाही येईल त्यावर संसार करीत असत. या बिकट परिस्थितीमुळे दादांचे शिक्षण अपुरेच राहिले होते. अशा अवस्थेत आशेचा एकच किरण दादांच्या पुढे होता. तो म्हणजे लम्रामध्ये दादांना ४०० रूपये हुंडा मिळाला तो दादांनी बँकेत ठेवला होता. त्याचे जीवावर काहीतरी करता येईल असा विचार दादा करीत होते. त्या पैशावर दादांनी लाकडाची वखार सुरू केली. हा धंदा चांगला चालू लागला व पुढे या धंद्यातच जम बसू लागला. त्याच दरम्यान देशभक्त आप्पासाहेब लाड भेटले व दादांना म्हणाले, ‘'मी मुंबईला तरुण गोदी कामगार युनियन काढली आहे. तीचे काम तासगावचा आपला सहकारी चंद्रकांत पोरे पाहत आहे तेव्हा तुम्ही त्याच्या मदतीला गेलातर बरे होईल आणि त्या मोबदल्यात मी तुम्हाला तीन शेरूपये देईन व तुमची जेवणाची व्यवस्था खानावळीत करीन. म्हणजे तीनशे रूपये घरी देता येतील’’. शेवटी नाइलाजाने दादा मुंबईला गेले व युनियनचे काम करू लागले. पण त्यात काही त्यांचे मन रमेना. घरी पाठवण्यास पैसे ही ते देऊ शकले नाही त्यामुळे दादा चिंतेतच होते. त्यातच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. चळवळीत सत्याग्रही भरतीचे काम करावयाचे होते. त्यामध्ये आकाराम दादा व चंद्रकांत ह्या दोघांनी ही सत्याग्रही म्हणून नाव दिली. त्यामध्ये ४ महिन्याचा काळ गेला.

स्वातंत्र्यानंतरचे सामाजिक व राजकिय कार्य

 १९५७ साली जी निवडणूक झाली त्यामध्ये दोनच मते कमी पडली म्हणून शेतकरी कामगा रपक्षाचे सरकार बनूशकले नाही. इतका विरोध थोड्या काळामध्ये तयार झाला. त्यावेळी दादांना सुद्धा वाटले की नजिकच्या काळामध्ये श्रमिकांचे राज्य येणार पण आज देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५-७६ वर्ष झाली पण आज पुरोगामी विचारापासून समाज दूरचालला आहे. जातीवादी, धर्मवादी, शक्ती दिवसें दिवस वाढते आहे, म्हणून जातीवादी शक्ती विरोधात काँग्रेस व पुरोगामी विचाराची शक्ती एकत्र करून सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे अत्यंत गरजेचे आहे. असे आकाराम दादा यांचे प्रामाणिक मत होते. १९५२ साली विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी दादांनी व त्यांचा सहकार्यांनी लालतारा हे कलापथक सुरू केले. हे लालतारा कलापथक महाराष्ट्रभर गाजले. पुढे या कलापथकाची धुरा पुंडलिक कुंभार या ध्येयवेड्या मुलाने सांभाळली. आपल्या घरादाराचा, संसाराचा विचार न करता लालतारा कलापथक हाच आपला संसार समजून कुंडलिक यांनी काम केले. ते परिस्थितीने गरीब होते व विचाराने श्रीमंत होते. पुढे १९५७ साली आकाराम दादा एक वर्षासाठी कुंडल गावाचे सरपंच झाले त्या काळामध्ये दादांनी न्यायदान खाते सुरू केले त्या काळी  त्या न्यायदान खात्या मार्फत भिसे यांच्या मोकळ्या जागेचे वाटप केले, गुंडा भैरु सावंत व दत्तोबा सावंत यांच्या जमिनीची मोजणी करून त्यांना न्याय दिला. तसेच २०० ते २५० भांडणाची प्रकरणे मिटवली त्यासाठी प्रत्येक गुरुवारी न्यायदान मंडळ चालू केले. भांडणे मिटवून ग्रामपंचायती मार्फत न्याय मिळवून दिला. सन १९६२ साली आकाराम दादा जिल्हा परिषदेवर निवडून आले व ८ विरोधी पक्षाचे सदस्य असताना, दखल घ्यावी असे कार्य केले. तसेच त्याकाळात अन्नधान्याच्या प्रश्नावर तासगांव तालुक्यात दहा गावाचा एक ग्रुप करून तालुका भरातील लोकांना घेऊन धान्याच्या प्रश्नावर मोर्चा काढला. तो लढा तासगांव तालुक्यात सुरू केला. पण त्याचे लोण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही फार मोठ्याप्र माणात गेले व त्याचा विचार करून शासनाला न्याय द्यावा लागला त्यावेळी हजारो लोकांना तुरूंगवास भोगावा लागला. तसेच त्यावेळी १९६२ ते १९६७ या काळात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षाचे ८ सदस्य असून सुद्धा कार्यकर्त्यांचा संच अभ्यासू असल्यामुळे अत्यंत नावाजण्या सारखे काम झाले त्याच काळामध्ये दादांनी १७ गावच्या पिण्याच्या पाण्याची स्किम मंजूर करून घेतली व या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.

सहकार चळवळीतील कार्य

१९७० ते १९७२ च्या दरम्यान कुंडल विविध कार्यकारी सोसायटी अगदी डबघाईला आली होती. तिचे चेअरमन पद, सर्वांच्या आग्रहाने आकाराम दादांना स्विकारावे लागले. त्या डबघाईला आलेल्या सोसायटीचे पुर्नजीवन करून कराडच्या व्यापारांची बोलणी करून सोसायटीत 'कापड दुकान' हा विभाग दादांनी सुरू केला. त्याचा लाभ आसपासच्या २० गावातील लोकांना मिळाला. तसेच सोसायटीस उर्जित अवस्था आली. त्यानंतर 'गणेशवाडी पाणीपुरवठा' 'योजनेचा चिफ प्रमोटर म्हणून आकाराम दादांनी काम पाहिले. जून १९८६ पासून १० वर्ष चेअरमन म्हणून काम दादांनी पाहिले. ही योजना दह्यारी, तुपारी, कुंडल, घोगांव अशा गावासाठी असून ती कोणाची तक्रार न येता चालवावी अशी दादांची इच्छा होती. आयुष्यात स्वताचे व सवंगड्याचे अनेक चढउतार दादांनी पाहिले. पण काम करण्याची जिद्द संपली नव्हती. १९८० साली शेतकरी कामगार पक्षाच्या अलीबाग येथील अधिवेशनात मतभेद झाल्यामुळे जी. डी. बापूंच्या समवेत कम्युनिस्ट पक्षात दादांनी प्रवेश घेतला. १९८१ला दिल्लीच्या मोर्च्यात कार्यकर्त्यांच्या समवेत भागीदारी केली. सांगली जिल्हा किसान सभेचा अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी मोर्चे काढून ग्रामीण जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न दादांनी केला. जिल्हा स्वातंत्र्य सैनिक सम्मान समितीचा उपाध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा करून देण्यासाठी दादांनी प्रयत्न केला. आकाराम दादांनी कृष्णा-येरळा साखर कारखान्याच्या निर्मिती साठी अथक प्रयत्न केले. सांगली जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचा अध्यक्ष म्हणून ग्रामीण बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. तसेच महाराष्ट्रातील एकमेव अशी कडेगांव येथे सर्व सोयींनी युक्त ग्रामोद्योग वसाहत सुरू केली. आकाराम दादांच्या या प्रवासात क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, शाहिर शंकरराव निकम, कॅ. रामभाऊ लाड, श्री. रामचंद्र लाड (राम मास्तर), डॉ. पतंगराव कदम यांच्या सारखे नेते, सहकारी आणि प्रवासाच्या वाटचालीत अनेक साथीदार, मित्र, सौगडी लाभत गेले पण आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर दादांना हा प्रवास घडी भराचा साथीदार वाटला.

दादांनी केलेले कार्य

  •        क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत प्रवेश.
  •        औंध येथील सेवादलाच्या शिबीरात सहभाग.
  •        सन १९४२ च्या तासगांव मोर्च्यात अग्रेसर, मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवून मोर्चा यशस्वी केला.
  •        नोकरी सोडून पूर्ण वेळ चळवळीत प्रवेश.
  •        सन १९४३ दरम्यान नाना पाटलांच्या नेतृत्वा खाली क्रांतिकारकांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी तुफानसेनेची स्थापना.
  •        तुफानसेनेचे कॅप्टन म्हणून काम.
  •        इस्लामपूर मोर्च्यात सहभागी व मोर्चाचे नेतृत्व.
  •        तुफानसेनेच्या माध्यमातून शेकडो क्रांतिकारकांना लष्करी प्रशिक्षण देऊन स्वयंसेवकाची फौज तयार केली.
  •        प्रतिसरकार मधील एक झुंजार स्वातंत्र्य सेनानी गावोगांवच्या पोलीस पाटलांचे राजीनामे घेऊन सरकारी महसूली उत्पन्न घटविले.
  •        टेलिफोनच्या तारा तोडणे, इंग्रज सरकारचे संदेश वहन यंत्रणा बंद पाडण्यात अग्रेसर.
  •        गावोगावी न्यायदान मंडळे स्थापन करून ग्राम स्वराज्याची कल्पना सुरूकेली.
  •        निमणी, वांगी, पाणमळेवाडी, बांबवडे येथील सरकारी बंगले जाळले.
  •        साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसेवादल संघटीत करण्यात पुढाकार.  
  •        डॉ. पंजाबराव देशमुखयांच्या विनंतीवरून मराठवाड्यात लष्करी प्रशिक्षण शिबीरे घेऊन चळवळ संघटीत केली.
  •        गोव्यातून हत्यारे व दारुगोळा आणून क्रांतिकारकांना पुरवण्या अग्रेसर.
  •        यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, उमरखेड, आप्पाचीवाडी (कर्नाटक) इत्यादी ठिकाणी लष्करी प्रशिक्षण शिबीरे घेतली.
  •        स्वातंत्र्याच्या काल खंडात ११ वर्षे पुर्णवेळ चळवळीत झोकून दिले.
  •        औंधच्या कारागृहात १ वर्षे कैदेत.
  •        स्वातंत्र्या नंतर सामाजिक चळवळीत अग्रेसर.
  •        कुंडल गावचे सरपंच म्हणून विधायक काम.
  •        सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम.
  •        गांधी एज्युकेशनचे सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यातही अग्रेसर.
  •        कुंडल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून सहकार चळवळीत काम.
  •        गणेशवाडी पाणीपुरवठा संस्थेत संस्थापक चेअरमन म्हणून शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविला.
  •        कृष्णा-वेरळा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न.
  •        जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष म्हणून शेतकरी व कष्टकऱ्यांच्या अनेक चळवळीत सहभाग.
  •        स्वातंत्र्य संग्राम सन्मान समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्य स्वातंत्र्य सैनिकाच्या प्रश्नासाठी अग्रेसर.
  •        अध्यक्ष, सांगली जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष म्हणून सुशिक्षित.
  •        बेरोजगारांच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्न व महाराष्ट्रातील एकमेवअशी सर्व सोयी नियुक्त ग्रामोद्योग वसाहत कडेगांव येथे सुरू केली.

सन्मान

  • तत्कालीन पंत प्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्र पत्र देऊन सन्मानित केले.
  • तत्कालीन महाराष्ट्र मुख्यमंत्री वसंतराव नाईक,महाराष्ट्र शासना मार्फात १९६६ साली सन्मान पत्र दादांना देण्यात आले.

प्रतिसरकारचे सैन्य दल तुफान सेना व त्यांचे प्रमुख[१]

१. क्रांतीअग्रणी फिल्डमार्शल श्री. जी. डी. (बापू) लाड - सेनापती

२. श्री. रामचंद्र (भाऊ) श्रीपती लाड - व्यवस्थापन व सेनादल प्रमुख तुफान

३. श्री. आकाराम (दादा) ज्ञानदेव पवार - प्रमुख कॅप्टन तुफान सेना.

क्रांती कारकांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या विरांगणा राजूबाई जशा होत्या त्याच प्रमाणे क्रांती कार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या क्रांती कारकांना आश्रय देणाऱ्या प्रसंगी लढयास सिद्ध असणाऱ्या विरांगणा होत्या त्यांचे नेतृत्व करणाऱ्या क्रांतीकारी विरांगणा.

१.     क्रांतीवीरांगणा सौ. लिलाताई पाटील –खानदेश

२.     क्रांतीवीरांगणा सौ. विजयाताई गणपती लाड– कुंडल.

३.     क्रांतीवीरांगणा राजूताई पाटील -अंकलखोप (ता. पलूस)

४.     क्रांतीवीरांगणा हौशाताई पाटील –हणमंतवडिये.

५. क्रांतीवीरांगणा गंगूबाई ना. लाड -  कुंडल (ता. पलूस)

सहाशेपन्नास गावात अहोरात्र भ्रमंती करून प्रतिसरकारची शक्ती वाढविण्याची निरनिराळ्या गावात शिबीरे संघटीत करून राष्ट्रसेवा दलाच्या शाखा चालू करणे व त्यामाध्यमातून निवडक तरूणांची तुफान सेनेत भरती करणेचे मेहनती काम करणारे व प्रसंगी जरूरी प्रमाणे क्रांती कार्यात सहभागी होणारे तुफान सेना दलातील कॅप्टन्स्.

१) श्री. बभ्रुवाहन जाधव –कापील- कराड.

२) श्री. शंकरराव गणपती जाधव –दुशेरे –कराड.

३) श्री. दादासो पाटील –दुशेरे –कराड.

४) श्री. सदाशिव काळे– आटके –कराड.

५) श्री. महादेव पाटील- आटके –कराड.

६) श्री. गणपती कुंभार- गोंदी -कराड.

७) श्री. ज्ञानबा जाधव -घोगांव-पलूस.

८) श्री. नारायणराव बाजी संकपाळ -बांबवडे.

९) श्री. कुंभार मास्तर –राजापूर-तासगांव.

१०) श्री. श्रीधर कुंभार -माजर्डे- तासगांव.

११) श्री. ज्ञानबा खराडे- मांजर्डे–तासगांव.

१२) श्री. बापूसाहेब जमदाडे –मणेराजूरी–तासगांव.

१३) श्री. रावसाहेब शिंदे– मळणगांव– क. महांकाळ

१४) श्री. भिमराव पाटील – अलकूड- क. महांकाळ.

१५) श्री. शामराव पाटील (मास्तर) –अंजणी- तासगांव.

१६) श्री. बाळकृष्ण माळी–आळते–तासगांव.

१७) श्री. विठ्ठल माने –शिरगांव–खानापूर.

१८) श्री. हंबीरराव धनवडे- भाळवणी- खानापूर.

१९) श्री. भगवान सव्वाशे– आळसंद–खानापूर.

२०) श्री. आकाराम घाईल– क. एकंद- तासगांव.

२१) श्री. रामचंद्र पाटील – क. एकंद- तासगांव.

२२) श्री. पांडुरंग जगदाळे–विसापूर- तासगांव.

२३) श्री. गणपती कासार -विसापूर- तासगांव.

२४) श्री. भिवा माने विसापूर- तासगांव.

२५) श्री. ईश्वर पाटील –हातनोळी–तासगांव.

२६) श्री. शामराव पाटील –हातनोळी–तासगांव.

२७) श्री. ज्ञानदेव बाळाजी जाधव -आसद-खानापूर.

२८) श्री. धोंडिराम जाधव -आसद-खानापूर.

२९) श्री. महादेव मोहिते- मोहितेवडगांव-खानापूर.

(३०) श्री. नामदेव आण्णा जाधव -बलवडी-खानापूर.

३१) श्री. परशूराम कोळी -बोरगांव- तासगांव.

३२) श्री. नारायण कृष्णा जाधव कुंडल-पलूस.

(३३) श्री. शामराव धोंडि थोरात -कुंडल-पलूस.

३४) श्री. शामराव पांडू चव्हाण-कुंडल-पलूस.

३५) श्री. ज्ञानबा बाबा पवार-कुंडल-पलूस.

(३६) श्री. शामराव पाटील –बोरगांव-तासगांव.

३७) श्री. शामराव पाटील –साखराळे–वाळवा.

३८) श्री. भिमराव पाटील –साखराळे–वाळवा.

३९) श्री. शामराव पाटील –रेठरेहरणाक्ष –वाळवा.

४०) श्री. आनंदराव जाधव–आळसंद–खानापूर.

४१) श्री. आबा नाना मोराळे–तासगांव.

४२) श्री. दत्ता जाधव -राजापूर - तासगांव.

४३) श्री. गोविंद जाधव- राजापूर-तासगांव.

४४) श्री. निवृत्ती पाटील –राजापूर-तासगांव.

४५) श्री. जयसिंगराव माधवराव माने –राजापूर- तासगांव.

४६) श्री. रंगराव पाटील- पुणदी तर्फ तासगांव- तासगांव.

४७) श्री. भिवा कोरे- खरसिंग– क. महांकाळ.

४८) श्री. बाबासो पाटील –बेळगांव– क. महांकाळ.

४९) श्री. पांडुरंग पाटील –हरोली– क. महांकाळ.

५०) श्री. साहेबराव शिंदे–मळणगांव– क. महांकाळ.

५१) श्री. भाऊसो पाटील –बोरगांव– क. महांकाळ.

५२) श्री. बाबुराव गायकवाड–बोरगांव– क. महांकाळ.

५३) श्री. पांडुरंग जगदाळे–विसापूर–तासगांव.

(५४) श्री. आनंदराव नलवडे- सोनकिरे–खानापूर.

५५) श्री. बाळकृष्ण मल्लू जाधव –सोनकिरे-खानापूर.

५६) श्री. दिनकर देशमुख- सोनकिरे- खानापूर.

५७) श्री. हिंदुराव पाटील- सोनकिरे -खानापूर,

५८) श्री. दगडू पवार -मोहिते वडगांव–खानापूर.

५९) श्री. महादेव पाटील- पार्ले- कराड.

६०) श्री. आण्णा पाटील –पार्ले- कराड.

६१) श्री. वसुदेव घाडगे -बनवडी- कराड.

६२) श्री. विश्वास पाटील –कवठे–वाई.

६३) श्री. रघुनाथ ढेरे- कवठे (वाई) –वाई.

६४) श्रीमती इंदुताई निकम– इंदोली–कराड.

६५) श्री. तुकाराम पाटील –शिरगांव–कराड.

६६) श्री. तुकाराम कोडुगले- इंदोली–कराड.

६७) श्री. महादेव साळुंखे–रेठरेबु॥ - कराड.

६८) श्री. गुलाब कोरबु- कार्वे–कराड.

६९) श्री. सिताराम जगताप–कडोली- कराड.

७०) श्री. मारुती माने (मार्केट) –गोंदीकराड.

७१) श्री. शंकर नांगरे- विरवडे–कराड.

७२) श्री. बाळू पाटील (काका) –गोंदी–कराड.

७३) श्री. हिंदुराव पाटील –घोगांव-पलूस.

७४) श्री. रामचंद्र काळे (भोई) –भवानीनगर- वाळवे.

७५) श्री. विठ्ठल सुतार–हणमंतवडिये  - खानापूर.

७६) श्री. गोविंदरावजोशी उर्फ बाळ -घोगांव.

संदर्भ