आर्णी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

आर्णी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. आर्णी हे अरूणावती नदीच्या काठी वसलेले गाव आहे, याच ठिकाणी एका सूफी संत बाबा कंबलपोषचा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.

तालुक्यातील गावे

  1. अकोला (आर्णी)
  2. आमणी
  3. आंबोडा
  4. आंजनखेड
  5. आंजरगाव आंजी
  6. आर्णी
  7. आसरा
  8. आयता
  9. बारभाई (आर्णी)
  10. बेलोरा
  11. भांडारी
  12. भांसारा
  13. बिड
  14. बोरगाव (आर्णी)
  15. ब्राह्मणवाडा
  16. चांदनी
  17. चटारी
  18. चिकनी खुर्द
  19. चिखली (आर्णी)
  20. चिमाटा
  21. चिंचबर्डी
  22. चिंचोळी
  23. दाभाडी (आर्णी)
  24. दाहेली
  25. दातोडी
  26. दत्तारामपूर
  27. देवगाव (आर्णी)
  28. देऊरवाडी
  29. दोनवाडा
  30. गणगाव
  31. गवाणा
  32. घोणसरा
  33. गुढा
  34. इचोरा
  35. इवलेश्वर
  36. जालंद्री
  37. जांब (आर्णी)
  38. जावळा
  39. काकडदरा
  40. कवठाबाजार
  41. काप (आर्णी)
  42. कारेगाव (आर्णी)
  43. काथोडा
  44. कवठा बुद्रुक
  45. केळझरा
  46. खडका
  47. खंडाळा (आर्णी)
  48. खेड (आर्णी)
  49. किन्ही
  50. कोळवण (आर्णी)
  51. कोपरा
  52. कोसदानी
  53. कृष्णानगर
  54. कुर्हा
  55. लिंगी

लोणबेहळ लोणी (आर्णी) महालुंगी मालेगाव (आर्णी) मंगरूळ (आर्णी) मानपूर म्हासोळा मोगरा (आर्णी) मुकींदपूर नाईक नगर नवनगर निधा पाहुर पळशी (आर्णी) पालोडी पांढुर्णा (आर्णी) पांगरी (आर्णी) परसोडा पिंपळनेर (आर्णी) पिंपरी (आर्णी) राणी धानोरा रुद्रपूर (आर्णी) साईखेड साखरा साकरी साकुर (आर्णी) सातारा (आर्णी) सावळी शेंदुरशनी शरी शेकलगाव शेळु शिरपूर (आर्णी) शिऊर सोनारी सुभाषनगर (आर्णी) सुधाकरनगर सुकळी तळणी (आर्णी) तरोडा तेंडोली उमारी उमरी (आर्णी) विठोळी वरूड (आर्णी) येरमाळ झापरवाडी

इतिहास

गावातील प्रतिष्ठित मंडळींनी सांगितल्याप्रमाणे, आर्णी या गावाला १५० वर्षाचा वारसा आहे. पुर्वी, हे गाव निजामाच्या संस्थानात होते पण भारत स्वातंत्र झाल्यावर सर्व संस्थाने खालसा झाल्यानंतर आर्णी हे गाव महाराष्ट्रात आले. १९३२ पुर्वी आर्णीला "उलटी पांढरी" म्हणत, कारण गावातील बरीच मंडळी गरीबा पासुन श्रीमंत तर श्रीमंता पासुन गरीब झाली. पण १९३२ साली इंग्रजानी व गावातील प्रतिष्ठित मंडळींनी अरूणावती नदीच्या नावावरून आर्णी नामकरण करण्यात आले.

तालुक्याची माहिती

आर्णी हा तालुका असून आर्णी तालुक्यात जवळ जवळ १११ खेडी [१] येतात म्हणून गावाची बाजारपेठ मोठी असून प्रसिद्ध आहे. प्रत्येक सोमवारी गावाला मोठा बाजार असतो. आर्णी तालुकयाचे क्षेत्रफळ ७६७ चौ कीमी [१] असून ह्या तालुक्याची लोकसंख्या १३९७८६ [१] इतकी आहे. तालुक्यात स्त्री पुरुषाची संख्या अनुक्रमे ६७७२४,७२०६२ [१] इतकी आहे. तालुक्यात पूर्ण ग्रामपंचायतची संख्या ७७ [१] इतकी असून त्यात ३०१६९ [१] इतकी आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या १८० [१] आहे तसेच २ [१] महाविद्यालय आहेत. तालुक्यात सरासरी पाउस ८५५.८ मीमी [१] इतका पडतो,त्यामुळे शेतकर्यांची संख्या २२०६९ [१] असून शेतमजुर ३२२६५ [१] इतके आहेत.

थोड आर्णी बद्दल

आर्णी हे गाव अरूणावातीच्या काठी वसलेले छोटे गाव होते कालांतराने गावाचा कायापालट झाला. नदी काठी सूफी संत बाबा कंबलपोषचा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील आरती दर्ग्यात ऐकु यावी तर दर्ग्यातील प्रार्थना मंदिरात ऐकु यावी हा रोजचा नित्यक्रम, गावाततही हिंदू मुस्लिम बांधव गुन्या-गोविंदानि राहतात. सूफी संत बाबा कंबलपोषच्या नावाणी दरवर्षी फेब्रुवारीत एका यात्रेचे आयोजन केले जाते, साधारण ही यात्रा ५ फेब्रुवारीला सुरू होऊन १० फेब्रुवारी पर्यंत संपते. ही यात्रा यवतमाळ जिल्यात फार मोठी यात्रा समजली जाते. या यात्रे साठी हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई मोठ्या संख्येने गर्दी करतात.

संदर्भ

साचा:विस्तार

साचा:यवतमाळ जिल्ह्यातील तालुके