आशीर्वाद (१९६८ चित्रपट)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट आशीर्वाद हा १९६८ सालचा बॉलिवूड चित्रपट असून, दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात अशोक कुमार आणि संजीव कुमार मुख्य भुमीकेत आहेत. अशोक कुमार यांनी सादर केलेल्या रॅप गाणे, "रेल गाडी", साठी हा चित्रपट उल्लेखनीय आहे.[१] या चित्रपटाने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.

कथानक

जोगी ठाकूर (अशोक कुमार) हा उच्च तत्त्वांचा एक साधा माणूस आहे. आपल्या पत्नीसह वीणा (लीला चौधरी) सासरच्यातर्फे मिळालेल्या मालमत्ते मध्ये तो राहत असतो. त्याच्या पत्नीच्या आदेशावरून ती धूर्तपणे गरीबांची घरे जाळण्याच्या आदेशा देते आणि चतुराइने जोगी ठाकूरच्या स्वाक्षर्या करून घेते. ही माहिती मिळताच तो आपला विवाह तोडतो, लहान मुलगी नीनाला पण मागे सोडून पुन्हा परत येणार नाही अशी शपथ घेऊन तो घर सोडतो. तो मुंबईत फिरतो, जेथे तो एका पार्कमध्ये मुलांचे मनोरंजन करून जगतो. त्याला एक लहान मुलगी आवडते जिचे नाव संयोगाने नीना (सारिका) असते. दुर्दैवाने, ती मुलगी आजारी पडते आणि तिचा मृत्यू होतो.

त्यानंतर जोगी आपल्या गावी चंदनपुरला परततो. तेथे त्याच्या एका ग्रामस्थ मित्रा बैजू (हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय)च्या मुलीचे अपहरण झाले आहे. एका धूर्त मुख्य लेखापालने तिच्यावर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात असतानाच तो धावपळ करत त्या ठिकाणी पोहचतो आणि त्या मुलीच्या रक्षणासाठी लेखापालाला ठार मारतो. त्याला वाचवण्यासाठी गावकरी काल्पनिक कथा बनवतात, परंतु तो कोर्टात खोटे सांगण्यास नकार देतो आणि त्याला तुरूंगावासाची शिक्षा होते. तेथेच तो बागेत काम करणे सुरू करतो आणि तात्त्विक कविता तयार करतो. तुरूंगातील डॉक्टर बिरेन (संजीव कुमार) त्यांना जोगी ठाकूर खास आवडतात. योगायोगाने जोगी ठाकूर यांची मुलगी नीना (सुमिता सान्याल) डॉक्टरांशी लग्न करणार आहे. त्याची मुलगी गुन्हेगारांचा द्वेष करते हे देखील त्याला कळते आणि म्हणूनच आपली ओळख समोर येऊ नये याची तो काळजी घेतो. त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल सरकार त्याला माफी देते व लवकर त्याची सुटका करते. डॉक्टर बिरेन त्याला वडिलधाऱ्यासमान मानू लागतो. तो जोगी ठाकूरला सांगतो की ज्या दिवशी तो तुरूंगातून सुटेल त्याच संध्याकाळी त्याचे लग्न आहे. जोगी ठाकूर आपल्या मुलीचे लग्न बघण्याच्या इच्छेने तेथे येतो. लग्नासाठी जमलेल्या भिकार्यांमधे तो सामील होतो आणि जोडप्याला आशीर्वाद देतो. तथापि, तो रस्त्यावर कोसळत असतानाच त्याची ओळख जमावाला समजते. त्याच्या शेवटच्या क्षणी वडिलांना भेटायला घटनास्थळी नीना येते.

निर्माण

चित्रपटाचे संगीत वसंत देसाई यांचे होते, गुलजार यांच्या गीतांवर. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी "रेल गाडी" हे गीत लिहिले आहे व अशोक कुमार यांनी गायलेले आहे. इतर गाणी लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायली आहेत.

पुरस्कार

१९६८ मध्ये या चित्रपटाला १६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच अशोक कुमारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जिंकला.[२][३]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट