Jump to content

आषाढ अमावास्या

मराठीपिडिया कडून

साचा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा

सुशोभित प्रज्वलित समई

दिव्याची अमावास्या म्हणजेच आषाढ महिन्यातील अमावास्या होय.[]

उत्सवी स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

आषाढ अमावास्येचे दीपपूजन

या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात.[] अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.[] या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करतात.[]

  • गटारी अमावास्या - अनेकजण चातुर्मासात, विशेषतः श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. त्यामुळे हा तीस दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी मांस-मद्य सेवन करण्याची रूढी अनेक ठिकाणी प्रचलित झाली आहे.[]

व्यावहारिक महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]

अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते. ज्याकाळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती त्याकाळात प्रचलित असलेले दीपपूजन औचित्यपूर्ण होते.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]