Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
आषाढ पौर्णिमा - मराठीपिडिया Jump to content

आषाढ पौर्णिमा

मराठीपिडिया कडून

आषाढ पौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

बौद्ध धम्म आषाढ पौर्णिमा महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]

१. या पवित्र पौर्णिमेच्या रात्री सिद्धार्थ गौतमाने माता राणी महामाया यांच्या गर्भात प्रवेश केला होता.  

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दुहेरी चमत्कार
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महाभिनिष्क्रमण

२. याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते

३. राजकुमार सिद्धार्थ आणि राणी यशोधरा यांचे एकमात्र पुत्र राजकुमार राहुल यांचा जन्म ही याच दिनी झाला.

४. भगवान बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश सुद्धा याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी दिला जो पुढे धम्मचक्रप्रवर्तन सुत्त म्हणून प्रसिद्ध झाला.

५. भगवान बुद्धांनी याच दिवशी दुहेरी चमत्कार दाखविला होता (खांद्यातून अग्नी व पायातून जल आणि शरीरातून सप्त रंग) प्रकाशित केले

६. तवातिंसा देवलोकात जाऊन ३ महिने त्यांची माता राणी महामाया यांना अभिधम्माचा उपदेश दिला.

७. आषाढी पौर्णिमा याच पवित्र पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो. जेथे ३ महिने भिक्षु आणि उपासक धम्माचा अभ्यास करतात.

साचा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा

या दिवशी साजरे करण्यात येणारे सण व उत्सव[संपादन | स्रोत संपादित करा]

कोकिलाव्रत[संपादन | स्रोत संपादित करा]

आषाढ हा अधिकमास आला असता त्या मासाच्या पौर्णिमेला या व्रताची सुरुवात व श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती करतात . कोकीलारूपी गौरी ही या व्रताची प्रधान देवता आहे . नक्तभोजन व पूजा ही याची प्रधान अंगे आहेत. हे व्रत संपूर्ण एक महिना करणे शक्य नसेल, तर कमीत कमी सात दिवस , निदान तीन दिवस तरी करावेच. महिलांनी करावयाचे व्रत .[]

साचा:विस्तार साचा:हिंदू सण

  1. भारतीय संस्कृति कोश -भाग २