गुरुपौर्णिमा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Wikify आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा[१] किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात.[२] या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे.[३] गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे जसे, महाभारतातल्या कथेमध्ये महान धनुर्धारी अर्जुना

बोधी प्राप्ती नंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते। आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुंना पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया,थायलंड,श्रीलंका,लाओस,म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते [४]

महर्षी व्यास

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.[५] व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.[६] महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास![७] पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले. ऋषि पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते

अन्य

व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणा-या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.[८][९] शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू , कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[१०]

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:हिंदू सण