आहोम साम्राज्य

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
आहोम साम्राज्य

साचा:आसामचा इतिहास आहोम साम्राज्य हे आसाम येथील ६०० वर्षे चाललेली (इ.स. १२२८ ते १८२६) राजवट होती. रुद्रसिंह या राजाच्या काळात सत्ता अतिशय बलवान व कळसाला पोहोचली होती. या सत्तेने मुघल राजांशी कडवट लढा दिला. राजा चक्रध्वजसिंह यांच्या काळातील लाछित बडफुकन हा त्यातील लढाऊ सेनापती म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगजेबाने आक्रमण केले असता मुघल-आहोम संघर्षात मोलाची कामगिरी बजावली.

सराईघाट येथील लढाई

इ.स. १६७१ च्या सराईघाट येथील लढाईत लाछित बडफुकन यांनी मोठा पराक्रम गाजवला. गुवाहाटी येथील मुघलांचा प्रमुख फौजखान याला पराजित करून त्याला कैद करण्यात आले. मोगलांनी परत आक्रमण केले असता त्यांनी शिवाजी महाराजांच्या सल्ला घेऊन त्यांच्याशी पत्रव्यवहार करून शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकाव्याने युद्ध करून मोगल सैन्याची वाताहत केली. पराजित मोगल सैन्याला गुवाहाटी येथून पळ काढावा लागला. अशा पराक्रमामुळे येथे इस्लामी सत्तेला पाय रोवता आले नाही.

शासन

या राजांनी शासकीय व्यवस्था, सरंजामदार, न्यायव्यवस्था इत्यादी संबंधी व्यवस्था पूर्णपणे निर्माण केली व राखली होती. या व्यवस्थेची अधिकृत कागदपत्रेही राखली गेली. यामुळे आसामच्या ऐतिहासिक अभ्यासाला मोठी मदत होते आहे.

हे सुद्धा पहा