इंद्राई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

इंद्राई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

साचा:किल्ला

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगण्यापाशी सुरू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईपर्यंत जाते. या रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात चार किल्ले आहेत, राजधेर, कोळधेर, धोडप, इंद्राई आणि चांदवड.

इतिहास

साचा:विस्तार-किल्ला

गडावर पाहण्याची ठिकाणे

गडाच्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलीकडेच डाव्या बाजूला कातळावर एक फारसी शिलालेख कोरलेला आढळतो. प्रवेशद्वाराचे फक्त अवशेषच शिल्लक आहेत.

गडमाथ्यावर गेल्यावर डावीकडे वळून थोडे पुढे गेल्यावर तीन वाटा लागतात. उजवीकडील वाट पकडली तर थोडयाच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. या सर्व गुहा पाहून व परत मागे फिरून वरती जाणारी मधली वाट पकडली तर थोडे पुढे गेल्यावर एक महादेवाचे मंदिर लागते. तेथून पुढे जाणारी वाट समोरच्या डोंगरावर घेऊन जाते. या दोन वाटांऐवजी जर डावीकडील वाटेने गेल्यास पुढे कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा लागतात. यापैकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत. शेवटच्या गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. इंद्राई किल्ल्यावरून राजधेर, कोळधेर, चांदवड, धोडप ईखारा हा परिसर दिसतो.

छायाचित्रे

गडावर जाण्याच्या वाटा

चांदवडहून राजधेरवाडीकडे जाणारी बसने चांदवड पासून ६ कि. मी. अंतरावर असणाऱ्याया वडबारे गावात उतरावे. येथून किल्ल्यावर जाणारी एक ठळक पायवाट आहे. गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास ३ तास लागतात.

सूचना

राहण्यासाठी गुहा आहेत. पाण्याची बारमाही सोय टाक्याच्या स्वरूपात आहे. खाण्याची सोय स्वतः करावी लागते.

हे सुद्धा पहा

साचा:महाराष्ट्रातील किल्ले