इंद्रिये (हिंदू तत्त्वज्ञान)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल सारथि जसा रथास जोडलेल्या घोड्यांचे नियमन करण्याविषयी प्रयत्न करितो त्याप्रमाणे विषय क्षणभंगुर आहेत इत्यादी जाणणाऱ्या पुरुषाने आपल्याकडे ओढून नेणाऱ्या विषयांचे ठयी रहाणाऱ्या इंद्रियांचे नियमन करण्याविषयी यत्न करावा. ॥८८॥

पूर्वीच्या ज्ञानी पुरुषांनी जी अकरा इंद्रिये सांगितली आहेत ती आधुनिकांच्या ज्ञानाकरिता मी संपूर्णपणे त्यांच्या नावांसह व कर्मांसह क्रमाने सांगतो. ॥८९॥ श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना व पाचवे घ्राण, वाक, पाणी, पाद, पायु व दहावे उपस्थ होय. ॥९०॥

या दहा इंद्रियातील श्रोत्रादिक जी पहिली पांच इंद्रिये ती ज्ञानाची साधने असल्यामुळे ज्ञानेंद्रिये होत.

व वागादि जी क्रमाने दुसरी पाच इंद्रिये सांगितली आहेत ती भाषण करणे इत्यादी कर्माची साधने असल्यामुळे कर्मेंद्रिये होत, असे इंद्रियवेत्ते सांगतात. ॥९१॥

अकरावे इंद्रिय मन होय असे जाणावे. ते आपल्या संकल्पगुणाने वर सांगितलेल्या दोन्ही इंद्रियांच्या गणांचे प्रवर्तक आहे. म्हणून एक मन जिंकले असता इंद्रियांचे हे दोन्ही समूह जिंकल्यासारखे होतात. ॥९२॥ इंद्रिये विषयांचे ठायी आसक्त झाली असता दृष्ट व अदृष्ट दोष निःसंशय प्राप्त होतात. पण तेच त्यांचे उत्तम प्रकारे नियमन केले असता मोक्षादि पुरुषार्थांची योग्यता हीच सिद्धि प्राप्त होते. ॥९३॥