इटानगर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर इटानगर ही भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इटानगर शहर अरुणाचल प्रदेशच्या दक्षिण भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसले आहे. इ.स. २०११ साली इटानगरची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती.

राष्ट्रीय महामार्ग ५२ ए इटानगरला आसाम राज्यासोबत जोडतो. इटानगरजवळील नहरलगुन हे रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीमध्ये येते. रेल्वेद्वारे जोडले गेलेले इटानगर हे गुवाहाटीअगरतला खालोखाल ईशान्य भारतातील केवळ तिसरे राजधानीचे शहर आहे. येथून गुवाहाटीसाठी रोज तर नवी दिल्लीसाठी आठवड्यातून एकदा गाड्या सुटतात.

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी