उंबरठा-पूजन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

उंबरठा म्हणजे मर्यादा.

आपल्या जीवनात विचार, विकार, वाणी, वृत्ती आणि वर्तन ह्यांच्या मर्यांदांचा स्वीकार झाला पाहिजे. आपल्या सर्वच ऋषींनी आणि आचार्यांनी वेदमान्य विचार सांगितले आहेत. त्यांनी विचारांवरील वेदांचे बंधन मान्य केलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या विकारांवरही बंधन असले पाहिजे. अनिर्बंध विकार, व्यक्ती आणि समाज दोघांचेही स्वास्थ्य नष्ट करतात. आपली वाणीदेखील मर्यादेने शोभणारी असली पाहिजे. कोठे बोलायचे? केव्हा बोलायचे? किती बोलायचे? काय बोलायचे? काय बोलायचे नाही? ह्याचा पूर्ण विचार करून माणसाने शब्दांचा उच्चार केला पाहिजे. अनियंत्रित वाणी अनेक अनर्थ निर्माण करते तर सुनियंत्रित वाणी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करते. माणसाने वृत्ती मर्यादाही स्वीकारली पाहिजे. दीन किंवा लाचार न बनता स्ववृत्तीने अनुकूल कर्म करून तेजस्वितेने जीवन जगले पाहिजे. वृत्ती संकरतेतून वर्ण संकरता उभी होते आणि समाज व्यवस्था बिघडून जाते. त्याचप्रमाणे माणसाने वर्तन मर्यादाही सांभाळली पाहिजे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला दुसऱ्याबरोबर राहाता आले पाहिजे. माझे प्रत्येक वर्तन भगवान पाहतो, हा भाव दृढ झाला तर आपले वर्तन आपोआप सुनियंत्रित बनते.

आपले विचार वेदमान्य, विकार धर्ममान्य, वाणी शास्त्रमान्य, वृत्ती वर्णमान्य तसेच वर्तन ईशमान्य असले पाहिजे असा संदेश परोक्षरीत्या उंबरठा स्वतःच्या मूक भाषेत देत असतो.


हेदेखील पाहा

वैदिक प्रतीक-दर्शन