उत्कर्ष शिंदे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट गायक

डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे (जन्म: ११ जानेवारी, १९८६) हे एक महाराष्ट्रातील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक भीमगीते, चित्रपट गीते व लोकगीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे.[१][२] ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत.[३] उत्कर्ष हे गायक आनंद शिंदे यांचे पुत्र आणि आदर्श शिंदेंंचे थोरले भाऊ आहेत.[४][५] उत्कर्ष यांनी पुणे, मुंबई, लंडन, अमेरिका येथे उच्च शिक्षण घेतले. एमडी फिजीशयन शिक्षण, पीजी इन लंडन, पीजीडीईएस एस (अमेरिका), पुणे येथेही शिक्षण घेतले. सध्या वैद्यकीय व्यवसायाबरोबर गायन, संगीत, गीत व अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. ते सामाजिक कार्य तसेच राजकीय कार्यांमध्ये सक्रिय आहेत.[६][७]

गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच आदर्श प्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.[४] 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष, आदर्श व आनंद यांनी पहिल्यांदा एकत्रितपणे गाणी गायली आहेत.[४] याखेरीज 'पॉवर', फुंकर, नंदू नटवरे, सिनेमांसाठी व आवाज महाराष्ट्राचा, गौरव महाराष्ट्राचा, संगीत खुर्ची, महामानवाची गौरवगाथा, छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा (सोनी), बाजीराव पोवाडा, या मालिकांसाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.[४] 'शिंदेशाहीची भीमशाही' हा उत्कर्ष शिंदे या संकल्पनेतून आलेला कार्यक्रम हा ३० कलाकारांसोबत आलेला कार्यक्रम महाराष्ट्राभर चालू असतो. "भीमराव एकच राजा", भीमराव एकच राजा हा कार्यक्रमात आदर्शसह उत्कृर्ष यांनी अनेक गाणी गायली होती.[८][४][४] डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या स्टार प्रवाह वरील मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधूंनी केले आहे. या दोघांनी पाचवे एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत केलेले आहे, व याची इतर भाषेतही रुपांतर हे बंधू करीत आहेत.[९][१०] "विजयाआनंद म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड" ही शिंदे घराण्याची कंपनी आहे, या माध्यमातून नवीन कलाकारांना संधी दिली जाते.

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या समस्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडल्या होत्या. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.[३]

उत्कर्ष शिंदे यांनी "हाक मारतयं कोल्हापूर", "गो-करोना, करोना गो", "कोविड योद्धा म्हणा", "आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा", "हळदीचा सोहळा" ही गीते गायले आहे. करोनामुळे नागरिकांमध्ये असलेले अनेक गैरसमज या "गो-करोना, करोना गो" व "कोविड योद्धा म्हणा", गीतांमधून दूर करण्याचा प्रयत्न केला असून काळजी कशी घ्यायची ते हसत खेळत सांगण्यात आले आहे.[११][१२]

डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांनी बिग बॉस मराठी ३ या 'रियालिटी शो' मध्ये सहभाग घेऊन अंतिम ५ स्पर्धकांपैकी एक असण्याचा मान मिळवला आहे. उत्कर्ष यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व व खेळातील एकूण सक्रिय सहभाग बघता त्यांना बिगबॉसच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू घोषित करण्यात आले आहे.[१३] तसेच ऑल राउंडर, मास्टर माइंड, आणि टास्क मास्टर ही विशेषणे बहाल करण्यात आली आहे.

पुरस्कार

  • बेस्ट डेब्यु सिंगर अवार्ड - "प्रियतमा" साठी (२०१३)

संदर्भ

साचा:संदर्भयादी