उनकेश्वर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील एक स्थळ. येथे गरम पाण्याचे झरे आहेत. {{ (लेखक-अरुण लक्ष्मीनारायण धकाते, धामणगाव रेल्वे 9405524184) माहूर -किनवट रोड वर माहूर शहरापासून 25 किमी अंतरावर सारखनी पासून पूर्वेकडे 15 किमी अंतरावर निसर्ग रम्य वातावरणात किनवट तालुक्यात वसलेले उनकेश्वर हे ठिकाण आहे. रामायण अध्याय 13 मध्ये या ठिकाणाचे वर्णन आलेले आहे. आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र 14वर्षे वनवास भोगताना सीता व लक्ष्मणासह या ठिकाणी काही काळ व्यतीत केल्याचे वर्णन आहे. या ठिकाणी भरभंग ऋषींनी तपश्चर्या केल्याचे वर्णन आढळून येते. उनकेश्वर येथे प्राचीन शिवलिंग आहे.येथील महादेवाचे पिंड 'उपलिंग' म्हणून ओळखले जाते. ज्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणे शक्य नाही, त्यांनी या उपलिंगाचे दर्शन केल्यास 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यासारखे आहे, अशी आख्यायिका आहे. उनकेश्वर येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्यात सल्फर अंशतः (गंधक )हे मूलद्रव्य (अधातू)आढळतो. या पाण्यात औषधी तत्वे आढळून येतात. या पाण्यात अंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित रोगांचे निर्मूलन होतात, अशी मान्यता आहे. यामुळे अनेक लोक येथे अंघोळ करण्यासाठी येतात. उनकेश्वर येथील परिसरात उपयोगी वनौषधी सापडतात. या वनौषधी पासून पांढरा कोड, सोरॅसिस, मधुमेह इत्यादी रोंगांवर औषध तयार केली जातात. उनकेश्वर येथे श्री संस्थान, उनकेश्वर ही सेवाभावी संस्था विनामूल्य लोकसेवा करित आहे. श्री संस्थान मार्फत मोफत अन्नदान केले जाते. यासोबत ही संस्था कुष्ठरोगीसाठी सेवा देते. श्री संस्थांनतर्फे निराधार वृद्धांना आश्रय दिला जातो. या संस्थेतर्फे वृद्धाश्रम व कुष्ठरोग सेवाश्रम सेवा ही अनमोल समाजसेवा ठरते. शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता ही संस्था भेट देणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र, रुग्णवाहिनी सेवा व निवास सेवा पुरविते. या संस्थानातर्फे वनौषधी पासून तयार केलेले विविध रोगांवरील औषधी माफक दरात विक्री केली जातात. (संकलन -अरुण लक्ष्मीनारायण धकाते धामणगाव रेल्वे 9405524184) }}