उमा शंकर दीक्षित

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

उमा शंकर दीक्षित (१२ जानेवारी इ.स. १९०१ - ३० मे इ.स. १९९१) एक भारतीय राजकारणी, कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल आणि कर्नाटकचे राज्यपाल होते.[१][२] १२ जानेवारी १९०१ रोजी उन्नाव जिल्ह्यातील उगू गावात त्यांनी जन्म घेतला. त्यांचे शिक्षण कानपूर येथून झाले. आपल्या विद्यार्थीजीवनानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. गणेश शंकर विद्यार्थी समितीचे अध्यक्ष असताना ते कानपूरच्या जिल्हा काँग्रेस समितीचे सचिव होते.

त्यांनी भारताचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल या सेवाही दिल्या. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष तसेच लखनौ येथे असोसिएटेड जर्नल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आपले गाव उगूमध्ये गर्ल्स इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना केली.[३] भारत सरकारने १९८९ साली त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[४]

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्या उमा दीक्षितांच्या सून आहेत.

संदर्भ

साचा:संदर्भयादी