औंढ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला

' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी (जिल्हा नाशिक) परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई तर पूर्वेकडील औंढ, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर.

कसे जाल ?

इगतपुरी बस स्थानकावरून सकाळी ७.०० वाजता भगूरकडे जाणारी एस.टी पकडून साधारणतः दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर साधारण नाक्यापासून ४५ मिनिटांत आपण निनावी गावात पोहचतो. निनावी गावातून औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

इतिहास

इ. स. १६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या राज्यात होता. इ. स. १६८८ नंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली.

छायाचित्रे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

औंढचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. गडावर पाण्याच्या चार-पाच टाक्या आहे. एका गुहेत पाणी आहे. खड्कात खोदलेला दरवाजा आहे. समोरच पट्टा किल्ला, बितनगड, अलंग, मदन आणि कुलंग, कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.

गडावरील राहायची सोय

नाही

गडावरील खाण्याची सोय

नाही

गडावरील पाण्याची सोय

बाराही महिने पाण्याची टाकी

गडावर जाण्याच्या वाटा

मार्ग

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ २ तास ३० मिनिटे

हे सुद्धा पहा

साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले