कंब रामायणम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
रावणाशी युद्ध करताना रामहनुमान, (चित्रनिर्मिती: अंदाजे इ.स. १८२०, तमिळनाडू ;)

रामावतारम (तमिळ: இராமாவதாரம் ; रोमन लिपी: Ramavataram ;) अर्थात कंब रामायणम (तमिळ: கம்ப இராமாயணம் ; रोमन लिपी: Kamba Ramayanam ;) हे तमिळ महाकवी कंबन याने रामायणावर रचलेले तमिळ भाषेतील महाकाव्य आहे.याचे कवीने दिलेले नाव "इरामावतारम" असे आहे. उत्तर भारतात तुलसी रामायणाला असलेले महत्त्व जे आहे तसेच महत्त्व तमिळनाडूत या रामायणाला आहे.[१]

स्वरूप

या ग्रंथात १०,०५० पदे असून बालकांड ते युद्धकांड अशी सहा कांडे यात आहेत.४००० श्लोक यात आहेत. तमिळ भाषेत या ग्रंथाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कंब रामायणात राम हा दैवी शक्तीचा अवतारी पुरुष आहे असे मानले गेले आहे. या रामायणाची प्रेरणा वाल्मीकींकडून घेतल्याचे कम्बन याने नोंदविले आहे.कंब रामायणाचे कथानक वाल्मीकि रामायणावर बेतले आहे, परंतु कंबनाने मूळ रामायणाचा केवळ अनुवाद अथवा छायानुवाद न करता, आपल्या प्रतिभेनुसार घटनांमध्ये अनेक बदल केले आहेत.

विषय

कंब रामायणात हिंदू धर्माची परंपरा,आणि संस्कृती यांच्या आधारे विषय मांडणी दिसते. विष्णूचा अवतार म्हणून रामाला येथे पात्र म्हणून वागणूक दिली असली तरी तयाचा कोणत्याही सांप्रदायिक चौकटीत बांधलेले येथे दिसून येत नाही. क्म्ब्नानी मिथिलेला सद्भावाचे तर रावणाच्या लंकेला अधर्माचे स्थान म्हटले आहे. कम्बन हा राजाला राष्ट्राचा प्राण असे मानीत नसून 'प्रजा' हा राष्ट्राचा प्राण आहे असे तो म्हणतो.[१]

अनुवाद

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी याचा इंग्लिश भाषेत पद्यमय अनुवाद केला आहे.

संदर्भ