काळदुर्ग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

काळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. साचा:किल्ला महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.

इतिहास

साचा:विस्तार-किल्ला खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.

इथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते


छायाचित्रे

गडावरील ठिकाणे

हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.

गडावर जाण्याच्या वाटा

वाघोबा खिंड मार्गे : वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.

बाह्य दुवे

साचा:महाराष्ट्रातील किल्ले