Jump to content

काशीबाई कानिटकर

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक काशीबाई कानिटकर (इ.स. १८६१ - इ.स. १९४८) या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला[]. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या[].

काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत[]. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.

काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या[].

कादंबरी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • रंगराव
  • पालखीचा गोंडा

कथा संग्रह[संपादन | स्रोत संपादित करा]

  • शेवट तर गोड झाला
  • चांदण्यातील गप्पा

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:मराठी साहित्यिक