कृष्णाबाई केळवकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:माहितीचौकट

कृष्णाबाई केळवकर ह्या पेशाने डाॅक्टर होत्या. मुंबईत आणि युरोपात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या होत्या. कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली.

त्यांनी १८९५ च्या पुण्यात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला होता.

शिक्षण

मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर कृष्णाबाईंनी पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. फर्ग्युसनमधले शिक्षण संपले, पण त्यांना डॉक्टर व्हायचे होते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाअंती त्यांनी परीक्षेत सर्वात जास्त गुण, तसेच सर्वात जास्त पारितोषिके मिळवली. पुढील शिक्षणासाठी त्या आयर्लंडला गेल्या. तेथे त्यांनी प्रसूतिविद्येचा अभ्यासक्रम पूर्ण केला.[१]

कारकीर्द

डाॅक्टर कृष्णाबाईंची कोल्हापूरच्या अलबर्ट मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून नेमणूक झाली. स्त्रियांच्या दवाखान्याचे खास विभाग सुरू करण्यात आले. कोल्हापूरमधील नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. महात्मा गांधी, गुरुदेव रानडे यांच्यासारखी मोठी माणसेसुद्धा कोल्हापूरला गेल्यावर कृष्णाबाईंची भेट घेत असत. वैद्यकीय सेवा करीत असताना त्या लेखनही करीत. मासिक मनोरंजन मधून ‘आजाऱ्याची सेवा’, ‘बालसंगोपन’, ‘मातेची कर्तव्ये’, ‘आजारी माणसाची खोली कशी असावी’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे लेखन त्यांनी केले.

पुरस्कार

सरकारने १९०८ साली, कृष्णाबाई केळवकरांच्या कार्याचा गौरव त्यांना “कैसर-ए-हिंद” हा किताब देऊन केला.

संदर्भ

साचा:संदर्भयादी